शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बारी समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 15:46 IST

बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथराव खडसे बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशानात देशभरातून एकत्र झाले समाज बांधवरुपलालजी महाराज यांना राष्टसंताचा दर्जा द्या 

 

जळगाव - बारी समाज जरी ओबीसीमध्ये गणला जात असला तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागे आहे. त्यामुळे बारी समाजाची प्रगती होण्यासाठी समाजाला अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत  प्रस्ताव मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यावर सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे अखिल भारतीय बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रामदास बोडके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे, बारी समाजाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनुप बारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा द्या १. एकनाथराव खडसे म्हणाले , बारी समाज संपूर्ण भारतात अनेक पोटजातींमध्ये विखुरला आहे. या समाजाचे देशासाठी मोठे योगदान आहे. तसेच रुपलालजी महाराज यांनी देखील समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले असून, शासनाने रुपलालजी महाराज यांना राष्टÑसंताचा दर्जा देण्याची गरज आहे. यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांसह शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांशी याबाबत बोलून निर्णय घेण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. २. बारी समाज देशभरात बरई, तांबोळी, चौरसिया, कुमरावत अशा पोटजातींमध्ये विखुरला आहे. समाज जरी मोठा असला तरी अजून देखील समाज एकत्र झालेला नाही. त्यामुळे समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच पोटजातींमध्ये ‘रोटी-बेटी’ व्यवहार देखील व्हावा यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असेही एकनाथराव खडसे म्हणाले. 

‘एक बारी, सब पे भारी’ बारी समाजाने प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, ‘एक बारी, सब पे भारी’ हे वाक्य सार्थ ठरवले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. समाजातील युवक देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत असून, समाजातील मुलींनी देखील आता पुढे येण्याची गरज असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले.