शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

उपोषण थांबविण्यास नकार

By admin | Updated: July 31, 2014 14:59 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विद्यापीठासमोर सुरू केलेले उपोषण बेकायदेशीर असून त्वरित उपोषण मागे घ्यावे, असे विद्यार्थ्यांना सांगितले आहे. मात्र, प्रश्न निकाली निघत नाही; तोपर्यंत आमरण उपोषण थांबणार नसल्याचे विद्यार्थी व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. 

सलग दुसर्‍या दिवशी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कुलसचिव ए. एम. महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांना उपोषण बेकायदेशीर असल्याचे पत्र दिले. तरीही विद्यार्थ्यांची 'कॅरिऑन'ची आग्रही मागणी आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. 
बेकायदेशीर उपोषण 
विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांची 'कॅरिऑन'ची मागणी अवास्तव आहे. नियम डावलून ही मागणी मान्य करता येणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण बेकायदेशीर आहे. त्वरित उपोषण मागे घ्यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. हे पत्र कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी मनसेचे बंटी नेरपगार व राकेशकुमार यांना बुधवारी दिले. त्यात नेरपगार यांनी २१ जुलैला कुलगुरूंना अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पत्र दिले. त्याच दिवशी इतर विद्यार्थ्यांनी ८0:२0 सीजीपीए प्रवेश पद्धतीनुसार तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याबाबतही पत्र दिले. २४ जुलै रोजी परीक्षा मंडळाच्या झालेल्या बैठकीत अभियांत्रिकी विद्याशाखेच्या शैक्षणिक वर्ष २0१२-१३ मध्ये सीजीपीए प्रवेशित विद्यार्थ्यांना मे-जून २0१४ च्या प्रथम, द्वितीय वर्षाची सीजीपीए प्रमाणे दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडिट बाकी किंवा अनुत्तीर्ण असले तरी सर्व विद्यार्थ्यांना २0१४-१५ मध्ये तृतीय वर्षात प्रवेश देण्याची मागणी मान्य केली. ए. टी. के. टी. संदर्भातील वरील नियमानुसार मे-जून २0१४ मध्ये झालेल्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना लागू राहील. ही सवलत फक्त जुन्या व नव्या अभ्यासक्रमासाठी मे २0१४ च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे यावर्षापुरतीच मान्य राहील. २0१४-१५ पासून जुन्या अभ्यासक्रमामधून सीजीपीए पॅटर्नमध्ये प्रवेशित होणार्‍या विद्यार्थ्यांना सीजीपीएनुसार ए. टी. के.टी. नियम लागू राहतील, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.
---------
विद्यार्थ्यांवर दबाव
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून दबाव तंत्राचा वापर होत आहे. त्वरित आंदोलन थांबविण्यात यावे, अन्यथा महाविद्यालयातूनच नाव कमी करण्यात येईल, अशी धमकी विद्यार्थ्यांना दिली जात आहे. तरीही उपोषणासाठी बसलेल्या दहा विद्यार्थ्यांपैकी धुळे, नंदुरबार, व जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येत आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही फोन लावून दडपण आणले जात असल्याचे मनसेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.