शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार मे.टन खतांचा कमी पुरवठा

By admin | Updated: May 9, 2017 00:57 IST

25 हजार मे.टन युरीया उपलब्ध : मागणी 3 लाख टनावर

जळगाव : जि.प.च्या कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे सरळ, संयुक्त व मिश्र खतांचा मिळून तीन लाख 30 हजार मे.टन एवढी मागणी केली होती. पैकी तीन लाख 25 हजार 700 मे.टन खते जिल्ह्यास मिळतील, अशी मंजुरी कृषी आयुक्तालयाने दिली आहे. अर्थातच मागणीच्या तुलनेत पाच हजार मे.टन खते कमी मिळतील. तसेच सध्या 2016 च्या रब्बीमधील शिल्लक असलेला 11 हजार 500 मे.टन व या हंगामात उपलब्ध झालेला 13 हजार 456 मे.टन असा जवळपास 25 हजार मे.टन युरीया जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती जि.प.च्या कृषी  विभागाने दिली आहे. खरिपाची तयारी कृषी विभागाने केली आहे. त्यात युरीयाबाबत अनेक तक्रारी असतात, पण मागील हंगामापासून निमकोटेड युरीया मिळत असून, त्याचा काळाबाजार, टंचाई कमी झाली आहे. यातच या हंगामासाठी आतार्पयत फक्त 25 हजार मे.टन युरीया उपलब्ध असल्याने एवढा युरीया अपुरा पडेल. त्यामुळे आठवडाभरात किंवा मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ार्पयत किमान एक लाख मे.टन युरीया जिल्हाभरात उपलब्ध करून घेण्यासंबंधी कृषी विभाग कार्यवाही करीत असल्याची माहिती मिळाली. पोटॅशची दरवाढपोटॅशचे दर गोणीमागे (50 किलो) 580 रुपये एवढे होते. त्यात 50 रुपये दरवाढ झाली असून, वाढीव दरातील गोण्या अजून प्राप्त झालेल्या नाहीत. ज्या गोण्यांवर जुनी 580 रुपये किंमत आहे त्याच दरात त्या विक्री करणे बंधनकारक असल्याची सूचना कृषी विभागाने प्रसारित केली आहे. जिल्ह्यात युरीयाची गरज अधिक असते त्यामुळे युरीयाची मागणीही कृषी आयुक्तालयाकडे केली होती. त्यानुसार एक लाख 24 हजार 500 मे.टन युरीया खरिपात अखेरच्या टप्प्यार्पयत जिल्हाभरात उपलब्ध होईल. तर संयुक्त म्हणजेच 10.26.26, 12.32.16, 20.20.0, 15.15.15 आदी खते मिळून 77 हजार 700 मे.टन एवढी उपलब्ध होतील. सध्या युरीयाचा पुरवठा कमी दिसत असला तरी अद्याप खरीप हंगामाची पेरणी, लागवड सुरू झालेली नाही. येत्या 15 दिवसात युरीयाचा अधिकाधिक पुरवठा होईल यासाठी कार्यवाही सुरू आहे. खते मुबलक प्रमाणात असतील.                            -मधुकर चौधरी,          कृषी विकास अधिकारी, जि.प.