शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शिक्षणाधिकाऱ्यांचे बनावट आदेश तयार करुन शिक्षक भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:49 IST

पाचोरा येथील गिरणाई व धुळ्याच्या धनदाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

जळगाव : संस्थेत रिक्त जागा नसतानाही तेथे रिक्त जागा असल्याचे भासवून माध्यमिक शिक्षणाधिकाºयांच्या सहीचे बनावट आदेश तयार करुन शिक्षक व शिपाई पदाची भरती केल्याप्रकरणी पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित परशुराम शिंदे यांच्यासह सचिव व संचालक तसेच धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी) धुळे संस्थेचे दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकू पाटील यांच्यासह इतर संचालकांविरुध्द मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी देविदास पंडीत महाजन यांनी फिर्याद दिली आहे.पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलिक आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा (वॉर्ड क्र.६) या शाळेत शासन निर्णयानुसार ८ पदे मंजूर होती व ही आठ पदे कार्यरत असताना संस्थेने मयूर किशोर महाजन, मिलिंद माधव सावळे, संगीता मनोहर सोनवणे, संदीप दिनकर पाटील, वैशाली पुरणदास राठोड यांची उपशिक्षक तर नितीन मिठाराम सोनवणे व निखील विकास नाईक यांची शिपाई म्हणून नियुक्ती केली. या नियुक्त्या करताना संस्थाध्यक्ष, सचिव, संचालक व मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बनावट सही करुन १७ नोव्हेंबर २०१७ च्या रोजीचे नियुक्ती आदेश काढले. नंतर हे प्रकरणे शिक्षणाधिकाºयामार्फत उपसंचालक (नाशिक) येथे न पाठविता शालार्थ आयडी म्हणून हे प्रकरण मंजूर करुन घेतले.अमळनेरला भरली चार पदेधनदाई एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी) ता.धुळे संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे मंजूर पदे रिक्त नसताना रोहिदास प्रताप ठाकरे, प्रदीप लीलाधर धनगर, भाग्यश्री रामदास वानखेडे व दत्तू भगवान कोळी यांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती केली. येथेही संस्थेचे दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकु पाटील, संचालक व मुख्याध्यापकांनी बनावट आदेश तयार करुन या नियुक्त्या करुन शासन व उमेदवारांची फसवणूक केली. शिक्षणाधिकारी कार्यालयातील बारनिशीमध्ये या नियुक्त्यांच्या नोंदी कुठेच आढळून आल्या नाहीत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षणाधिकारी महाजन यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, संचालक व मुख्याध्यापक यांच्याविरुध्द तक्रार दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव