शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

वर्षभरात 23 लाख रुपयांचा दंड वसूल

By admin | Updated: March 6, 2017 00:48 IST

अवैध गौण खनिज वाहतूक : गेल्या दोन महिन्यात कारवाई जोरदार

पाचोरा : तालुक्यात  अवैध वाळू उपशावर कडक कारवाई होत असून जवळपास वर्षभरात आज अखेर्पयत  23 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. यामुळे चोरटी वाहतूक करणा:यांमध्ये धडकी भरली आहे.गेल्या दोन महिन्यात कारवाई वेगात सुरू असून सध्या पाचोरा तहसील आवरात वाहने उभी करायला जागा नसून 20 ट्रॅक्टर, 2 डंपर जप्त केले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून  जप्त वाहनांची सुटका न झाल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.महसूल विभागावर जि.प-पं.स. निवडणुकीचा ताण असतानाही तालुक्यातील अधिका:यांनी वचक निर्माण केल्याचे दिसत आहे. तहसीलदार व प्रांताधिकारी  आता आयएएस वर्गातील असल्याने कठोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे महसुलात वाढ झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील वाळूचे ठेके लिलावाअभावी बंद आहे. यामुळे चोरटय़ा वाहतुकीशिवाय वाळू मिळत नाही तेव्हा शासनाने वाळू व गौण खनिजाची दैनंदिन रॉयल्टी रोख  भरणा स्वीकारुन तहसीलदार यांचेकडील परवाना देऊन सुरु करावी व महसूल गोळा करावा, अशी मागणी आहे. तर 2 हजार रुपये प्रतिब्रास रॉयल्टीचा दर ठेवला तरीही एका वाहनाला 6 ब्रासची दैनंदिन परवाना दिल्यास मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळेल व चोरी होणार नाही, असे बोलले जात आहे.फेब्रुवारीत 82 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यात गिरणा, तितूर, अग्नावती नद्या वाहतात. पैकी गिरणा नदीची वाळू उत्कृष्ट असल्याने परजिल्हय़ात वाढती मागणी असल्याने 8 ब्रासचे डंपर जेसीबीने ताबडतोब भरले जाते तर ट्रॅक्टरदेखील भरून चोरीने वाळू वाहतूक होते. मात्र महसूल कर्मचा:यांनी मोठी कारवाई करीत तहसील आवारात सर्व जप्त वाहनांचाच  गराडा असल्याने तहसीलदारांचीच गाडी लावण्यास जागा नाही.