शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्सकडून दररोज 20 रुपये वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 00:55 IST

बळीराम पेठ, सुभाष चौक तसेच टॉवर ते घाणेकर चौक परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयाच्या ऐवजी 20 रूपये वसुली केली जात असून मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होनाजी चव्हाण यांनी केला़

जळगाव : शहरात काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येऊन वाहतुकीला अडसर ठरणा:या विक्रेत्यांना उठवित स्थलांतराचा पर्याय देण्यात आला़ यादरम्यान बळीराम पेठ, सुभाष चौक तसेच टॉवर ते घाणेकर चौक परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयाच्या ऐवजी 20 रूपये वसुली केली जात असून मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होनाजी चव्हाण यांनी केला़ तर दुसरीकडे आयुक्तांनी संबंधित प्रकाराबाबत नेमकी तक्रार काय ती आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली आह़ेबळीरामपेठ, सुभाष चौक तसेच टॉवर चौक ते घाणेकर चौक या दरम्यान विक्रेत्यांकडून दररोज दहा रूपयांची पावती वसुली केली जात होती़ मात्र 2 जानेवारी पासून या विक्रेत्यांकडून महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचा:यांकडून दहा रूपयांच्या दोन लाल रंगाच्या विना नावाच्या पावत्या देवून 20 रूपयांची वसुली केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे, अशी माहिती होनाजी चव्हाण यांनी दिली़ 20 रूपये वसुलीबाबत काही ठराव, किंवा फेरीवाला समितीचे नवीन धोरण असेल, त्याबाबत माहिती द्यावी? जर हॉकर्सच्या जागेनुसार पैशांची वसुली असेल तर रस्त्यावर किंवा घरासमोर रस्त्याला अडथळा ठरणा:या चारचाकी मालकांकडून पैसे वसूल केले जावेत, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला़  योग्य निर्णय न झाल्यास गळचेपी धोरणाविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरू असा, इशारा चव्हाण यांनी दिला आह़े नोंदणीकृत हॉकर्सकडून दर महिन्याला तीनशे रूपयांची वसुली केली जात़े त्यानुसार पावती दिली जात़े नोंदणीकृत नसणा:या विक्रेत्याकडून दररोज दहा रूपये व जागा जास्त असल्यास वीस रूपये वसूल केले जातात़ पावतीवर नाव टाकण्याचे कायदेशीर बंधन नाही़ पावतीमुळे वसूल झालेला पैसा हा मनपा फंडातच जमा होतो़ होनाजी चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठविला आह़े त्यामुळे नेमकी त्यांची तक्रार काय ते समजून येत नाही? तक्रारीसाठी महानगरपालिका आह़े काही गैरप्रकार असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़ - जीवन सोनवणे, आयुक्त,