शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

दुर्मीळ रानकुत्र्यांची २० वर्षांनंतर नोंद; सातपुडा पर्वतरांगा आश्रयस्थान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 08:31 IST

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे.

जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा दुर्मीळ पक्षी, वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी वरदान ठरत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण रानकुत्रे म्हणजेच भारतीय ढोल या संकटग्रस्त सस्तन प्रजातीची वन्यजीव संरक्षण संस्थेच्या राहुल व प्रसाद सोनवणे या वनस्पती व पक्षी अभ्यासकांना तब्बल २० वर्षांनंतर नोंद घेण्यात यश आले आहे. 

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा अनेक दुर्मीळ व संकटग्रस्त प्रजातींसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. जिल्ह्यात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, पाणमांजर, खवलेमांजर, तडस, कोल्हे, लांडगे अशा सर्वच महत्त्वपूर्ण प्रजातींचे अस्तित्व आहे. नावीन्यपूर्ण दुर्मीळ वनस्पती, पक्षी, प्राणी प्रजाती या भागातून नोंदविल्या जात आहेत.

रानकुत्र्यांची भारतीय वनांतील संख्या २५०० पर्यंत आहे. नुकत्याच प्रसिद्ध होणाऱ्या रेड डाटा बुक मध्ये रानकुत्र्यांच्या सद्य:स्थितीची नोंद म्हणजे धोकाग्रस्त म्हणून केलेली आढळते. त्यामुळे धोकाग्रस्त असलेल्या भारतीय वाघांप्रमाणेच रानकुत्र्यांच्याही संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती व पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

रानकुत्र्यांची वैशिष्ट्ये रानकुत्रे हे जंगली कुत्रे, ढोल, कोलसारा, कोलसा अशा नावांनी ओळखले जातात. रानकुत्रे समूहात राहणारे प्राणी असून, पाळीव कुत्र्यांपेक्षा आकाराने मोठे असतात. लांडग्यांप्रमाणेच त्यांचे माेठमाेठे कळप असतात. हरीण, काळवीट, नीलगाय, ससे हे त्यांचे नेहमीचे खाद्य आहे. भुकेलेल्या जंगली कुत्र्यांनी माेठी रानडुकरे, गवे, बिबट व वाघांवरही हल्ला करून ठार केल्याची उदाहरणे आहेत.

वाघ, रानगवे, रानकुत्रे यांसारख्या प्राण्यांना अशाच विस्तृत जंगलाची आवश्यकता असते. या प्राण्यांचे जिल्ह्यात आढळणे हे जिल्ह्यातील वनांची गुणवत्ता व वढाेदा-अनेर व्याघ्रसंचारमार्गाचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करणारे आहे. - राहुल सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, (वन्यजीव संरक्षण संस्था)