शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मानवाधिकाराचे धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानचा रावेरच्या सुपुत्राने फाडला दहशतवादी बुरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

रावेर : मानवाधिकाराचे दुसऱ्या देशांना धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रानखान यांचा ढोंगी चेहरा जगासमोर उघडा पाडताना पाकिस्तान हा ...

रावेर : मानवाधिकाराचे दुसऱ्या देशांना धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रानखान यांचा ढोंगी चेहरा जगासमोर उघडा पाडताना पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बालेकिल्ला असून, क्रूरकर्मा दहशतवाद्यांना पाकिस्तान धर्माच्या नावाखाली पैसा जमवून, पेन्शन पुरवून व त्यांना राजाश्रय देत असल्याचा घणाघाती हल्ला चढवला. किंबहुना आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घालून दहशतवादामुळे जाणाऱ्या निष्पाप बळींसाठी पाकिस्तानलाच का जबाबदार धरले जाऊ नये? असा खडा सवाल उपस्थित करून पाकी दहशतवादाच्या बुरख्याची चिरफाड संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार स्थायी मोहिमेचे भारताचे प्रथम सचिव पवनकुमार बढे यांनी केली आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील मूळ रहिवासी तथा महापारेषणचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता तुळशीदास बढे यांचे ते सुपुत्र आहेत. जिनेव्हा येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत ते बोलत होते.

मानवाधिकाराच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानला झोडपून काढत पाकिस्तानच्या अवघड जागेवरचे दुखणे जगासमोर मांडल्याने पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. इस्लामिक कट्टरपंथी दहशतवादाचा पाकिस्तान बालेकिल्ला असल्याचे वास्तव जगासमोर मांडून पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा त्यांनी फाडला आहे. पाकिस्तानमधील दुसऱ्या जातीधर्माच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पाकी सरकारने ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची गरज असल्याचे बढे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानातल्या अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी त्या सरकारने सुनिश्चित करण्याची गरज आहे. पाकिस्तानमधील दरराेज राजरोसपणे होणाऱ्या धर्मांतरांच्या घटना सहजरीत्या घडत असल्याबाबत बढे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर पाशवी अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर केले जात असताना मात्र पाकिस्तान सरकारकडून त्याकडे हेतुत: दुर्लक्ष केले जात असल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. एव्हाना, पाकिस्तान सरकारला अल्पसंख्याक समाजाची सुरक्षा वा मानवाधिकारांशी कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक वा देणेघेणे नसल्याबाबतच्या उदासीनतेचा बढे यांनी बुरखा फाडला.

पाकिस्तानमधील पत्रकारितेची स्थिती आपल्यासमोर असून, पाकिस्तानला जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्राचे मॉडेल बनण्याचा गौरव पत्रकारितेत प्राप्त झाला आहे. किंबहुना, पाकिस्तान सरकारवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणे, मारझोड करणे, छळ करणे, हवेत उडवून देणे व चक्क त्यांचा सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठी हत्या करण्याचे निंदनीय प्रकार केले जात असल्याचीही टीका बढे यांनी करून जगासमोर पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे.