शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

रावेरला गणेशोत्सव व मोहर्रमनिमित्त पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 17:51 IST

‘श्रीं’ विसर्जन व मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन केले.

रावेर : अनंत चतुर्दशीला होणारे ‘श्रीं’चे विसर्जन व मोहर्रम सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रावेर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरून तडफदार पथसंचलन केले.यात शीघ्र कृती दलाचे सशस्त्र ५१ जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती येथील प्लाटून, दंगा नियंत्रण पथक व धडक कृती दल, रावेर पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या २०० जवानांनी मोठ्या दिमाखात पथसंचलन करून पोलीस दल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज असल्याचे दर्शन घडवले.पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, शीघ्र कृती दलाचे असिस्टंट कमांडंट रमेश वर्मा व सारंग सुर्वे, राज्य राखीव पोलीस दलाचे फौजदार तायडे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे व अनिस शेख यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर