शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यात खानापूर मंडळाखेरीज ६ मंडळात मे हिटच्या ४५ सेल्सिअंश पेक्षा जास्त तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:04 IST

तालुक्यात मे हिटच्या तडाख्यात सूर्याने आग ओकल्याने किमान ४५.०१ ते कमाल ४८. ०१ तापमानाची नोंद तालुक्यातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झाली आहे.

ठळक मुद्देकिमान ४५.०१ ते कमाल ४८. ०१ तापमानाची नोंद अतिउष्ण तापमानाचा ४१ हजार रू संरक्षित विमा सहा मंडळांना, तर अवघ्या चार शतांश तापमानाच्या त्रुटीने आठ हजार रू. प्रतिहेक्टरी विम्याचा फटका

किरण चौधरीरावेर : तालुक्यात मे हिटच्या तडाख्यात सूर्याने आग ओकल्याने किमान ४५.०१ ते कमाल ४८. ०१ तापमानाची नोंद तालुक्यातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झाली आहे. खानापूरसह ऐनपूर, खिर्डी, निंभोरा, सावदा, खिरोदा व रावेर मंडळातील केळीबागा या अतिउष्ण तापमानाच्या भट्टीत कमालीच्या होरपळून उद्ध्वस्त होत आहेत. तथापि, खानापूर येथील महसूल मंडळातील सततच्या पाच दिवसांपैकी एका दिवशी ४५ सेल्सिअंश तापमानात ०.०४ शतांश कमी अर्थात ४३.९६ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाल्याने खानापूर महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल महिन्यातील ३३ हजार रू प्रतिहेक्टरी विम्यावरच समाधान मानावे लागणार आहे. महावेधच्या तांत्रिक त्रुटीमुळे हेक्टरी आठ हजार रू.चा संरक्षित विम्याच्या रकमेचा फटका बसणार आहे. किंबहुना उर्वरित ऐनपूर, खिर्डी, रावेर, निंभोरा, सावदा व खिरोदा महसूल मंडळातील सतत पाच दिवस, सतत नऊ दिवस तर कुठे सतत १२ दिवसांच्या ४५ ते ४८ सेल्सिअंशवर तापमानाची नोंद झाल्याने संबंधित केळी उत्पादकांना हेक्टरी ४१ हजार रू संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे.रावेर तालुक्यातील सर्व सातही महसूल मंडळातील केळी उत्पादकांना माहे एप्रिल महिन्यात किमान ४२ सेल्सिअंश तापमानापेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची नोंद झाल्याने ३३ हजार रू प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली होती. तथापि, मे हिटच्या तडाख्यात सूूर्याने जणूकाही आग ओकल्याने किमान ४५.०१ ते ४८.०२ सेल्सिअंश तापमानाची पाच ते १२ दिवसांच्या अतिउष्ण लहरींची नोंद महावेधच्या ऐनपूर, खिर्डी, रावेर, निंभोरा, सावदा व खिरोदा महसूल मंडळातील हवामानमापक यंत्रावर झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सहा महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल व मे महिन्यातील अतिउष्ण तापमानाचा ४१ हजार रू च्या संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होणार आहे. या संरक्षित विम्याच्या रकमेने प्रत्यक्षात असह्य व प्रतिकूल तापमानात केळी बागांची झालेली करोडो रुपयांची अपरिमित हानी भरून निघणारी नसली तरी, या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मातीमोल भावात विकलेल्या केळीमालाच्या रकमेत काहीअंशी भर टाकण्यासाठी साह्यकारी ठरणार आहे.सातही महसूल मंडळातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झालेली नोंद अशीखानापूर महसूल मंडळातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर दि. २३ ते २७ मे दरम्यान चार दिवस ४५ सेल्सिअंशपेक्षा जास्त ४६. १६ सेल्सिअंश पर्यंत नोंद झाली आहे. मात्र २३ मे रोजी ४४.९६ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली. यामुळे ०.०४ शतांश तापमानाच्या यांत्रिक तथा तांत्रिक त्रुटीमुळे खानापूर महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल व मे महिन्यातील अतिउष्ण तापमानाचा ४१ हजार रू च्या संरक्षित विम्याच्या रकमेऐवजी आठ हजार रू प्रतिहेक्टरी कमी रकमेचा फटका बसणार आहे. परिणामत: एप्रिल महिन्यातील ४२ सेल्सिअंश पेक्षा जास्त तापमानाची संरक्षित विम्याच्या ३३ हजार रू.रकमेवर त्यांना समाधान मानावे लागणार आहे.दरम्यान, ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान ४५.०१ ते ४६. १७ सेल्सिअंश सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाच्या नोंद झाली आहे.खिर्डी बुद्रूक महसूल मंडळात १९ ते २७ मे दरम्यान सतत ९ दिवस किमान ४५.०४ ते कमाल ४६.४८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.खिरोदा महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान सतत पाच दिवस किमान ४५.२३ ते कमाल ४७.०३ तापमानातील उष्ण लहरींची नोंद झाली आहेनिंभोरा महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान सतत पाच दिवस किमान ४५.३ ते कमाल ४६. ९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.रावेर महसूल मंडळात १९ ते २७ मे दरम्यान सतत ९ दिवस किमान ४५.०९ ते ४५. ८७ सेल्सिअंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.सावदा महसूल मंडळात १७ ते २८ मे दरम्यान सतत १२ दिवस किमान ४५.९ ते कमाल ४८.०१ अतिउष्ण कमालीच्या तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRaverरावेर