शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

रावेर तालुक्यात १० तर अमळनेरमध्ये ११ गावे संवेदनशील

By admin | Updated: February 11, 2017 00:19 IST

जि़प़ व पं़स़ निवडणुक : अमळनेरात जिल्हाधिकाºयांची पोलीस अधिक्षकांसह भेट

रावेर/अमळनेर : तालुक्यातील १० गावांमधील ४४ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे निवडणूक यंत्रणेने घोषीत केले आहे. अशा गावांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मुंबई पोलीस अधिनियम १४९ अन्वये नोटीस बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अमळनेर येथे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी भेट देवून तडीपारचे प्रस्ताव निकाली काढून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले़  रावेर तालुक्यात मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या कक्षेपलीकडे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राखून व्हीडीओ चित्रणाद्वारे संवेदनशील केंद्रावर सुक्ष्मनजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, नायब तहसीलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.जि.पं.-पं.स. निवडणुकीसाठी   २०७ मतदान केंद्र आहेत. त्यातील १० केंद्र संवेदनशील असल्याचा संयुक्त अहवाल फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यात रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत अहिरवाडी (तीन मतदान केंद्र), रसलपूर (पाच मतदान केंद्र), वाघोड (तीन मतदान केंद्र), खिरवड (दोन मतदान केंद्र), अजंदा (दोन मतदान केंद्र), पाल (चार मतदान केंद्र) अशी सहा गावांमधील १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सावदा पोलीस स्टेशनअंतर्गत चिनावल (नऊ मतदान केंद्र) व वाघोदा बु.।। (सात मतदान केंद्र) असे १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत तर निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत विवरे बु.।। (६ मतदान केंद्र) तर खिर्डी बु.।। येथील (३ मतदान केंद्र) असे नऊ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. १२ रोजी मतदान यंत्रांची                सेटींग व सिलिंग रावेर तहसील कार्यालयातंर्गत असलेल्या खुल्या जागेत शामीयाना उभारण्यात आला आहे. रविवार, १२ रोजी २०७ मतदान केंद्रावरील मतदान यंत्राचे मतदान पत्रिकेसह सेटींग व सिलिंग करण्यात येणार आहे. त्याकरीता २५ टेबलवर प्रत्येकी सात कर्मचाºयांद्वारे ही प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. जि.पं.-पं.स. उमेदवार वा उमेदवार प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नायब तहसिलदार उमाकांत कडनौर यांनी दिली.           (वार्ताहर)अमळनेर तालुक्यातील  संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत ठेवा, तसेच तडीपारचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढा अशा सूचना जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी आज अधिकाºयांना दिल्या.४जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रांत कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, सां.बा.चे.उपविभागीय कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, मारवडचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहायक गटविकास अधिकारी बी.डी.गोसावी, कृषी अधिकारी बी.जी.पाटील हजर होते. ४अमळनेर पोलीस स्टेशनअंतर्गत जानवे, शिरूड, पिळोदा, पातोंडा, दहीवद, मठगव्हाण तर मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत अमळगाव, मांडळ, खापरखेडा, वासरे, कळमसरे ही ११ गावे संवेदनशील असून, या गावांकडे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी लक्ष ठेवावे असेही यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले.४बैठकीनंतर अधिकाºयांनी मतदानपेट्या ठेवण्यात येणाºया इंदिरा भवनची पहाणी केली.