शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य शिल्लक असतानाही जळगाव शहरातील रेशन दुकाने राहताहेत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:40 IST

ऐन दिवाळीत ग्राहकांची गैरसोय : ५० टक्के कार्डधारकांचे धान्य घेणे बाकी

ठळक मुद्दे५० टक्के कार्डधारकांनीच नेलाय मालठरवून दिलेल्या तारखेव्यतिरिक्तही बहुतांश रेशन दुकाने बंदकेसरी कार्डधारकांसाठी धान्यच मिळेना

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२२- रेशन दुकानांमध्ये धान्य शिल्लक असताना ते उघडेच ठेवले पाहिजेत, असा नियम असतानाही ठरवून दिलेल्या तारखेव्यतिरिक्तही शहरातील बहुतांश रेशन दुकाने रविवार, २२ रोजी बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती घेऊन संबंधीतांना ताकीद देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. ऐन दिवाळीच्या काळात दुकाने बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.५० टक्के कार्डधारकांनीच नेलाय मालजिल्ह्याला १६.१२५ मेट्रीक टन म्हणजेच ९ लाख ६० हजार क्विंटल धान्य दरमहा मिळते. आॅक्टोबर महिन्यासाठीदेखील तेवढेच धान्य मिळाले होते. एकूण ६ लाख कार्डधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख कार्डधारकांनी रेशन दुकानांवरून धान्य नेले आहे. म्हणजेच अद्यापही ५० टक्के लोकांनी धान्य नेलेले नाही. म्हणजेच ते धान्य रेशन दुकानांमध्ये शिल्लक आहे. असे असल्याने सर्व रेशन दुकाने सुरू असणे आवश्यक होते. मात्र रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळात केलेल्या पाहणीत अनेक रेशनदुकाने बंद असल्याचे आढळून आले. दीक्षीतवाडी, गणेशवाडी, शिवाजीनगर, हरेश्वरनगर आदी भागातील रेशन दुकाने बंद असल्याचे आढळून आले. तर रामानंदनगरातील रेशनधान्य दुकान सुरू असल्याचे आढळून आले.केसरी कार्डधारकांसाठी धान्यच मिळेनायाबाबत रेशनदुकानदाराकडे विचारणा केली असता केवळ प्राधान्य कुटुंबासाठीचेच धान्य मिळत असून केसरी कार्डधारकांसाठीचे धान्य मिळत नसल्याचे तसेच साखर तर गेल्या अनेक महिन्यांपासूनच मिळणे बंद झाल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारणा केली असता केसरीकार्ड धारकांना धान्य मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे असून बीपीएल कार्डधारक तसेच ४४ हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या ७६.२५ टक्के लोकांना धान्य मिळत आहे. केवळ उर्वरीत २४ टक्के लोकांना (नॉन प्रायॉरिटी हाऊसहोल्डस किंवा अप्राधान्य कुटुंब) धान्य मिळत नसल्याचे सांगितले.-----रेशन दुकानात दिलेल्या नियतनाचे धान्य शिल्लक असेपर्यंत ठरवून दिलेल्या दिवसाखेरीज अन्य सर्व दिवस दुकान सुरू ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर ही रेशन दुकाने बंद असतील तर त्याची माहिती घेऊन संबंधीताना ताकीद दिली जाईल.- राहुल जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी