शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार रेशन कार्ड लाभार्थ्यांना अद्ययावत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वस्त धान्य मिळावे यासाठी शासनाने गरजूंना शिधापत्रिका दिली असून, यामध्ये लाभार्थ्यांची विभागणी करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वस्त धान्य मिळावे यासाठी शासनाने गरजूंना शिधापत्रिका दिली असून, यामध्ये लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे. विभागणीनुसार लाभार्थ्यांना अन्नधान्य तसेच इतर सुविधा मिळतात. मात्र अनेकवेळा लाभार्थी एका गावातून दुसऱ्या किंवा अन्य राज्यातही जातात. अशावेळी त्यांचे हाल होऊ नयेत, त्यांच्या हक्काचे धान्य, शिधापत्रिकेची अद्ययावत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘वन नेशन - वन रेशन कार्ड’ ही योजना सुरू केली. या माध्यमातून कुठलीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणाहून लाभ घेऊ शकणार आहे. लाभार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी आता ‘मेरा रेशन’ हे मोबाइल ॲपही विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येक बाबीची माहिती होणार आहे.

या मिळणार सुविधा

लाभार्थ्यांना मिळणारे धान्य

जवळपास असलेली रास्त भाव दुकाने

शिधापत्रिकेवर उचल झालेल्या धान्याची माहिती

शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र?

लाभार्थी करू करणार तक्रार

‘मेरा रेशन’ ॲपवर लाभार्थ्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत रास्त भाव दुकानातून त्याला त्रास होत असेल, धान्य मिळत नसेल किंवा अन्य माहितीसाठी लाभार्थी आपली तक्रार तसेच अभिप्राय यावर नोंदवू शकणार आहेत.

जिल्ह्यातील लाभार्थी

एकूण शिधापत्रिकाधारक - १०,००६१३

अंत्योदय १,३३,४०८

प्राधान्य कुटुंब ४,७६,५२८

---------------_-

रेशन कार्डवर मिळणारे धान्य, जवळपास असलेले स्वस्त धान्य दुकान आदींची माहिती ‘ मेरा रेशन’ ॲपवर मिळेल. हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शिधाकार्डवरील अद्ययावत माहिती जाणून घेता येईल.

- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी