शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात रेडिरेकनरच्या दरात 5 ते 10 टक्के वाढ

By admin | Updated: April 2, 2017 11:10 IST

जिल्ह्याच्या रेडिरेकनरच्या दरात शासनाने 5 ते 10 टक्के वाढ केली आहे. मनपा क्षेत्रासाठी ही वाढ 9.45 टक्के अशी असेल.

 जळगाव, दि.2- जिल्ह्याच्या रेडिरेकनरच्या दरात शासनाने 5 ते 10 टक्के वाढ केली आहे. आतार्पयतची ही सर्वात कमी वाढ असून मनपा क्षेत्रासाठी ही वाढ 9.45 टक्के अशी असेल. जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क विभागामार्फत विविध मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. दरवर्षी या खरेदी विक्री व्यवहारावरील स्टॅँप डय़ूटीचे दर शासनाकडून निर्धारित केले जात असतात. गेल्या वर्षी शासनाने रेडिरेकनरच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ केली होती. यावर्षी ही वाढ 5 ते 10 टक्के आहे. तर महापालिका क्षेत्रात ही वाढ 9.45 टक्के  असेल. 

मुद्रांक शुल्कचे उद्दीष्ट 
मुद्रांक शुल्कचे जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क विभागाला वसुलीचे 184 कोटींचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात या विभागाने 145 कोटींची वसूली वर्षात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
रक्ताच्या नात्यात खरेदी 600 रुपयात
मालमत्ता रक्ताच्या नात्यात म्हणजेच मुलगा, मुलगी, वडील, आई, मयत मुलाची प}ी यांच्यात मालमत्ता देण्या-घेण्याचा व्यवहार असल्यास यापुढे 200 रुपयांचा स्टॅँप, 200 रुपये नोंदणी फी व 200 रुपये जिल्हा परिषद सेस भरून  करून देता येईल असा निर्णय झाला आहे. खरेदी ही भाऊ बहिण यांच्यात असेल तर 3 टक्के स्टॅँप डय़ूटी भरावी लागणार आहे.  एखाद्या व्यक्तीस मालमत्ता बक्षीस पत्र करून द्यावयाची असल्यास 200 रुपयांचा स्टॅँप, 200 रुपये नोंदणी फी व 200 रुपये जिल्हा परिषद सेस अशा 600 रुपयात व्यवहार होऊ शकेल. 
 
मनपा क्षेत्रात बांधीव घर खरेदी
मनपा क्षेत्रात बांधकाम केलेले घर असल्यास आताचे व पूर्वीचे दर (कंसात) पुढील प्रमाणे आहेत. आरसीसी 20,900 (19000), लोडबेअरिंग  17,665 (16,150), इतर पक्के बांधकाम 12,540 (11,500), कुडा, मातीचे घर 7,315  (6650). 
ग्रामीण क्षेत्राचे दर
आरसीसी बांधकाम - 16,720 (15,200), लोडबेअरिंग बांधकाम 14,212 (12,920), इतर पक्के बांधकाम 10,032 ( 9,120), कुडा मातीचे बांधकाम 5,852 (5,320) या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत. 
 
 
नवीन दर तत्काळ लागू
 रेडिरेकनरच्या दरांचे वैशिष्टय़ म्हणजे सुक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे तसेच ग्रामीण, पालिका क्षेत्र तसेच महापालिका क्षेत्र असे सुटसुटीत नियोजन करण्यात आले आहेत. नव्याने लागू करण्यात आलेले दर हे 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.