शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात शिवसेनेचा पाळधी महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:21 IST

भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बुधवारी दुपारी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान पाळधी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देतीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगामहावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आश्वासनपोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

धरणगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातुन पाठ फिरवताच वीजेच्या भारनियमनाला सुरुवात झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, युवकांची अडचण झाली आहे. भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बुधवारी दुपारी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गा दरम्यान पाळधी फाटा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महावितरण व प्रशासनाने आंदोलनस्थळी येऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यात भारनियमन सुरु केले आहे. सकाळ, दुपार, रात्री अशा तीन टप्प्यात वीज गायब होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याविरोधात संतप्त शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांसह पाळधी फाटा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे व सचिन पवार, तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. सुमारे दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे धुळे व जळगावच्या दिशेने दोन्ही बाजुला ३ कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, कवठळ सरपंच नितिन कोळी, विभाग प्रमुख गोकुळ लंके, शेरी सरपंच कुमावत , पाळधी सरपंच प्रकाश पाटील ,राजाराम कोळी, दीपक सावळे ,अनिल कासट, धर्मेन्द्र कुंभार ,संजय पांडे, हाजी सुलतान पठान, हाजी अहमद शेख, सादिक देशमुख, दानिश पठान, युवा सेना शहर प्रमुख मनोज माळी, पप्पू माळी, पिंटू कोळी, किशोर सोनवणे, दिनेश कडोसे, बलराम कोळी, चंदू इंगळे उपस्थित होते.