शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात शनिवारी पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांमध्ये राजस्थान विद्यापीठ, जयपूर आणि महिलांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या संघांनी विजेतेपद मिळवले. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलांच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील अव्वल चार संघ भुवनेश्वर ...

ठळक मुद्देउमविचा नागपूरवर ३-२ ने विजयपश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धा पुरुष गटात राजस्थानला विजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात शनिवारी पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांमध्ये राजस्थान विद्यापीठ, जयपूर आणि महिलांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या संघांनी विजेतेपद मिळवले. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलांच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील अव्वल चार संघ भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या अ.भा. बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.पुरुषांच्या गटात जयपूर आणि कोल्हापूर विद्यापीठाने चार गुणांची कमाई केली. मात्र जिंकलेल्या गेमच्या आधारावर जयपूर विद्यापीठाला विजयी घोषित करण्यात आले, तर कोल्हापूरला तिसरे स्थान देण्यात आले. त्याचप्रमाणे उमवि आणि नागपूर विद्यापीठाचे दोन गुण आहेत.शनिवारी सकाळी महिलांच्या झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात वीर नर्मद दक्षिण विद्यापीठ, सुरत विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्यात झालेल्या लढतीत नागपूर संघाने सुरत विद्यापीठावर २-१ ने विजय प्राप्त केला. तर महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्यात झालेल्या लढतीत बडोदा संघाने जयपूर संघाला २-१ ने नमविले. पुरुष संघांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विरुद्ध उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झालेल्या सामन्यात जळगाव संघाने नागपूर संघाला ३-१ ने नमविले. तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विरुद्ध राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात जयपूर संघाने ३-० असा एकतर्फी विजय मिळविला. साखळी सामने संपल्यानंतर एकूण गुणांच्या आधारावर चार क्रमांक जाहीर करण्यात आले.  महिलांमधून वैष्णवी भाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, तर पुरुषांमधून पीयूष मीणा, राजस्थान विद्यापीठ, जयपूर हे एकूण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले. महिला व पुरुष संघातील हे चारही संघ ५ ते ९ जानेवारीदरम्यान भुवनेश्वर येथे होणाºया अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  समारोप उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, कुलसचिव भ.भा. पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.जी.ए. उस्मानी यांनी केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले.

उमविचा नागपूरवर ३-२ ने विजयउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर ३-२ ने विजय मिळवला.उमविच्या प्रणव पाटील याने अपूर्व आग्रेवर २१-१२,२१-१० असा विजय मिळवला.नागपूरच्या गौरव रेगे याने एकेरीत उमविच्या दिलीप शिरसाठवर २१-१२, २१-१३ असा विजय मिळवला.दुहेरीत उमविच्या प्रणव पाटील आणि शुभम पाटील यांनी नागपूरच्या गौरव रेगे आणि प्रतीक बोंडे यांच्यावर २४-२६, २१-१८, २१-१६ असा विजय मिळवला.तिसºया एकेरी सामन्यात शुभम पाटील याने विनय माकोडेवर २३-२५, २१-१५,२२-२० असा विजय मिळवला.

स्पर्धेचा अंतिम निकालमहिला संघ- प्रथम- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (६ गुण), द्वितीय- वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत (४ गुण), तृतीय- महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (२ गुण), चतुर्थ- राजस्थान विद्यापीठ, जयपूर (० गुण) .पुरुष संघ- प्रथम- राजस्थान विद्यापीठ, जयपूर (४ गुण), द्वितीय- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (४ गुण), तृतीय- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (२गुण), चतुर्थ- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (२ गुण).

 

 

टॅग्स :Sportsक्रीडा