शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळला नागरीप्रश्न रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 21:54 IST

तहसीलदार आंदोलनस्थळी आल्यावर मागे घेतले आंदोलन

भुसावळ : शहरातील रस्त्यांची कामे सात दिवसात पूर्ण करण्यात यावी, अमृत योजनेची चौकशी करून दोषींच्या संपत्तीवर बोजा टाकण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील बेघरांना घरे देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनाधार पार्टी व महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन सुरू होते. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.तहसीलदार दीपक धिवरे यांनी विविध १३ मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. जे रस्ते बनवले त्यात डांबर कमी व रॉकेल जास्त वापरल्यामुळे ते रस्तेही उखडले आहे. तर अमृत योजनेचे कामही उलट्या दिशेने सुरू करण्यात आले आहे. प्रथम पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर टाक्यांचे काम सुरू झाले. त्यानंतर पाण्याचा उद्भव शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. खरे तर प्रथम पाण्याचा उद्भव शोधण्याची गरज होती. मात्र पाईपात मिळणाऱ्या कमिशनसाठी उलट्या दिशेने काम सुरू झाले असल्याचा आरोप माजी आमदार चौधरी यांनी आंदोलनस्थळी बोलताना केला आहे. तरी या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या संपत्तीवर बोजा टाकून पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामध्ये माजी आमदार चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेवक ललित मराठे, भीमा कोळी, नगरसेवक शेख मुस्ताक शेख मुसा, सलीम पिंजारी, साजिद शेख, नगरसेवक जाकीर सरदार सिकंदर खान, अशोक चौधरी, माजी नगरसेवक आशिक खान शेर खान, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे मुन्ना सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, संजय खडसे, संतोष साळवे, विलास खरात, अ‍ॅड. प्रमोद चव्हाण , सूनील दांडगे, शैलेश अहिरे, वनिता खरारे, रेखा सोनवणे, राणी खरात, सिद्धार्थ सोनवणे, सलीम कुरेशी यांच्यासह शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे, तालुकाध्यक्ष मराठे, ललित मराठे, गटनेते पगारे आदींनीही मनोगत व्यक्त केले.अशा आहे इतर मागण्यारेल्वे प्रशासनाने उत्तर भारतातील गरीब लोकांची घरे कोच फॅक्टरी बनवण्याच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र या जागेवर कोणतीही कोच फॅक्टरी होत नसल्यामुळे याच जागेवर बेघर वासियांना हक्काची घरे बांधून देण्यात यावी व दुकानदारांना पुन्हा दुकाने बांधून देण्यात यावे., शहरात पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ही पाणीटंचाई दूर करावी, डेंग्यूमुळे शहरातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये नगरपालिकेकडून मदत करण्यात यावी व आरोग्य विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मुख्याधिकारी रजेवर असताना प्रभारी मुख्याधिकारी बबनराव तडवी यांच्या नियुक्ती दरम्यान पदाचा गैरवापर करून ठेकेदारांची दोन कोटी रुपयांचे बिले मंजूर करण्यात आली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.