शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्यात रंगतोय काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार दिलीप वाघ यांची २८ मे रोजी मुख्य प्रशासकपदी निवड जाहीर झाली, ...

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार दिलीप वाघ यांची २८ मे रोजी मुख्य प्रशासकपदी निवड जाहीर झाली, तर ॲड. अभय पाटील, एस.डी. पाटील, रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, युवराज पाटील व अनिल महाजन अशा एकूण सहा जणांचा प्रशासक म्हणून समावेश करण्यात आला. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी हे आदेश दिल्यानंतर २९ मे रोजी प्रशासक मंडळाने सूत्रे हातात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये असलेला असंतोष दिसून आला आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पत्रकार परिषदेत पक्षातील आमदाराविरुद्ध असलेला असंतोष व्यक्त करून आमदारांचा निषेध केला.

महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करीत आहेत. असे असताना महाविकास आघाडीचे आमदार किशोर पाटील हे आघाडीचे प्रमुख आहेत. म्हणजेच पालक असून, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे ऑगस्ट २०२०मध्ये पाचोरा विश्रामगृहात एक गोपनीय बैठक आमदार व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली आणि यात त्यांनी दोघा पक्षांचे प्रशासक म्हणून कोणते पदाधिकारी घ्यायचे हे ठरवले. यालाही शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी तिलांजली देत स्वतःच्या पक्षाच्याच १८ पदाधिकाऱ्यांची यादी दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना शिफारस केल्याचा आरोप सचिन सोमवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला.

त्यावेळी तत्कालीन संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्याने त्यांना स्थगिती मिळाली म्हणून हा विषय जैसे थे थांबला. मात्र पुन्हा शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ याच्यासह पाच लोकांची यादी पाठवली. यावेळी कॉंग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असताना काँग्रेसला विश्वासात न घेता कॉंग्रेसला डावलण्याचा प्रकार केल्याने याचा आम्ही निषेध करत महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्यादेखील याबाबत लेखी तक्रार केली असल्याचे सांगितले. नवीन प्रशासक मंडळात अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावलले असून, येणाऱ्या काळात आमदार पाटील यांनी काॅंग्रेसला दुजाभावाची वागणूक देऊ नये, अशी अपेक्षा सोमवंशी यांनी व्यक्त केली. यावेळी शहर अध्यक्ष ॲड. अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, महिला आघाडीच्या शिला सूर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमात ही बातमी येताच बरोबर शिवसेनेद्वारे या घटनेचे खंडन करत प्रा. एस.डी.पाटील हे काँग्रेस पक्षाचेच सदस्य असल्याचे सांगण्यात आले, तर २८ सप्टेंबर २०२० रोजी काँग्रेस आयचे तत्कालीन तालुका अध्यक्ष साहेबराव गजमल पाटील आणि जिल्हाध्यक्ष यांनी प्रा. एस.डी. पाटील यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत असून, काँग्रेस पक्षातच तालुका स्तरावर एकमत नसल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे तर काँग्रेस पक्षाच्या एका जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्याला आमदार किशोर पाटील यांनी न्याय देत पाचोरा भडगाव बाजार समितीसारख्या महत्त्वाच्या संस्थेत प्रशासक म्हणून संधी मिळवून दिली असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.