युवाशक्ती फाऊंडेशनचे सैनिकांसोबत रक्षाबंधन
जळगाव : शहरातील युवाशक्ती फाऊंडेशन व स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनच्या युवतींतर्फे शहरातील एनसीसी मुख्यालयातील सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. एनसीसीचे सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार अजित कुमार, सुभेदार सुनील पालवे, हवालदार विक्रम सिंग, अनिल कुमार, शैलेंद्र कुमार, मुकेश कुमार यांना राख्या बांधुन औक्षण करण्यात आले. यावेळी स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनच्या वैष्णवी खैरनार, विनिता पाटील, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, नदाल मोदक, चाहत कटारिया, विराज कावडीया, अमित जगताप, सयाजी जाधव, उमेश देशमुख, यश भालशंकर उपस्थित होते.
नेवे फाऊंडेशनतर्फे बालगृहात रक्षाबंधन
जळगाव : शहरातील जलाराम नगर येथील लीलाई बालगृहात स्व.श्वेता वाणी-नेवे फाउंडेशनतर्फे राखी पौर्णिमेचे औचित्य साधुन बालगृहातील अनाथ मुलांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनतर्फे मुलांना पेन, मास्क, व चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सुरेश भोळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद वाणी, उपाध्यक्ष रोहन नेवे, संचालिका विनंती नेवे, शिखा वाणी, राजश्री नेवे, बालगृहाचे अधिक्षक विठ्ठल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील, श्रीनिवास नेवे, शैलेश वाणी, रेणुका नेवे, मिद्धिशा नेवे यांनी परिश्रम घेतले.