शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

दु:खद..! रक्षाबंधनापूर्वीच भावावर अंत्यसंस्काराची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:59 IST

शहरातील काम आटोपून घराकडे जात असताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमहामार्गावर पुन्हा अपघात महामार्गाची दैनासलग दुस:या दिवशी महामार्गाने घेतला बळी

जळगाव/नशिराबाद, दि. 7 - शहरातील काम आटोपून नशिराबाद येथे घराकडे जात असताना भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार नितीन एकनाथ आमोदकर (32 रा़ नशिराबाद) याचा जागीच मृत्यू झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेले प्रमोद प्रल्हाद माळी (वय 30, रा. नशिराबाद) हे गंभीर जखमी झाले.  मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर  तरसोद फाटय़ाजवळ रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ तीन ते चार दिवसांपासून रक्षाबंधनासाठी मुंबईहून आलेल्या बहिणीकडून ओवाळणीपूर्वीच भाऊ नितीन हा क्रूर काळाने हिरावून घेतल्याने नशिराबादमध्ये शोककळा पसरली. दरम्यान, सलग दुस:या दिवशी महामार्गावर हा अपघात झाला. 

नशिराबाद येथील रहिवासी नितीनचा आई, वडील, लहान  भाऊ व बहिणी असा परिवार आह़े.  वडील शेती करतात़. नितीन एमआयडीसीतील एका कंपनीत वर्षभरापासून नोकरीला होता़. तर लहान भाऊ विनोदही रोजंदारीवर काम करुन भाऊ व वडीलांना उदरनिर्वाहात हातभार लावतो़. रविवारी सुटी असल्याने नितीन  घरगुती कामासाठी दुचाकी (क्र. एम.एच. 19 -2939)ने जळगावात आला होता़.  सांयकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली असून ट्रॅक्टरसह चालकाचा पोलीस शोध घेत आह़े. गावातील त्याच्या मित्रांसह नागरिकांनीही जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती़. सायंकाळी नितीनवर नशिराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आल़े. लग्नासाठी मुलीचाही शोध सुरु असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली़. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आह़े . 

शनिवारी दुपारी याच राष्ट्रीय महामार्गावर बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत कास्ट्राईब संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊराव अभिमन्यू सपकाळे (वय 60 रा़ भुसावळ) यांचा मृत्यू झाला होता़ तर त्याच्यासोबतचे सेवानिवृत्त शिक्षक रमजान रसुल तडवी रा़रावेर हे गंभीर जखमी झाले होत़े सलग दुस:या दिवशी या महामार्गावर ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत नितीनचा जागीच मृत्यू झाला़.  नितीनची मोठी बहिण कविता बोरनारे या मुंबईला असतात. सोमवारी रक्षाबंधनसाठी त्या तिघा मुलांसोबत नशिराबादला माहेरी आल्या आहेत़ मात्र रक्षाबंधनाच्या ओवळणीपूर्वीच क्रूर काळाने नितीनवर झडप घातल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.  आई, वडील, बहिण व लहान भाऊ विनोद यांना माहिती कळताच जिल्हा रुग्णालय गाठल़े यावेळी कुटुबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता़ .  

राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाटय़ाजवळ नशिराबादकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणा:या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली़ यात चाकाखाली आल्याने नितीनच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला़.  तर प्रमोद हे गाडीवरुन फेकल्या गेल्याने जखमी झाले असून त्याच्या तोंडाला मार लागला आह़े घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक अशोक खरात,  वासुदेव मराठे, गोकूळ तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत 108 रुग्णवाहिकेतून दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविल़े