शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साकडे पंढरीत... पाऊस चाळीसगावात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 16:57 IST

चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे.

ठळक मुद्दे२२०० भाविक वारीहून परतलेआबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावहून अलंकापुरी पंढरपुरात दाखल झालेल्या २२०० भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घातले अन् पावसाने चाळीसगाव परिसरावर गेल्या तीन दिवसांपासून भीज पावसाची छत्र धरली आहे. पांडुरंगाने आमची करुणा ऐकली. अशा आनंदी प्रतिक्रिया या भाविकांनी मंगळवारी पहाटे चाळीसगावी आल्यानंतर व्यक्त केल्या.समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. या सर्व २२०० भाविकांनी सोमवारी सकाळी हरिनामाच्या गजरात लक्झरी बसेस आणि चारचाकी गाड्यांमधून पंढरपूरकडे कुच केली होती. युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून ‘चला भेटूया विठुरायाला’ वारीचे आयोजन केले होते.दरम्यान, मंगळवारी पंढरपूरहून परतलेल्या भाविकांनी आपल्या आप्तांना प्रेमालिंगन देऊन वारीची सांगता केली.रविवारी २२०० भाविकांना ओळखपत्रे देण्यात आली. यात आबालवृद्धांसह तरुणांचाही सहभाग होता. सकाळी सीताराम पहेलवान यांच्या मळ्यात हरिनामाचा गजर करीत भाविकांनी शोभायात्रा काढली. भक्तीगीत गायनाचा कार्यक्रमानंतर हे सर्व भाविक पंढरपूरकडे रवाना झाले. वाटेत त्यांच्या मुक्कामासह जेवण व नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.सोमवारी विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी परतीच्या वाटेवर प्रस्थान केले. मंगळवारी पहाटे सिग्नल चौकात भाविकांचे आगमन झाल्यानंतर ‘ज्ञानोबा - तुकाराम’ अशा जयघोष करण्यात आला. मंगेश चव्हाण यांनी सहपत्नीक भाविकांचे स्वागत केले.