शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यात पावसाच्या शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

जळगाव : तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी या भागात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. यामुळे ...

जळगाव : तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी या भागात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. यासह तालुक्यातील भोकर, किनोद, कठोरा या भागात देखील पावसाने हजेरी लावली. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण कायम असल्याने, तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.

कानळदा येथील अनधिकृत लसीकरणाबाबत चौकशी होणार

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी परिसरातील गाव पुढाऱ्यांच्या कुटुंबीयांना लस देण्याच्या प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच असे प्रकार इतर ठिकाणी घडत असतील तर याबाबत देखील चौकशी करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी रस्सीखेच

जळगाव : गेल्या महिन्यात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात अवघ्या आठ मतांनी पराभव पत्करलेल्या माजी नगरसेविका पुत्र जाकीर पठाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासह माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, नीलेश पाटील यांचे नाव देखील आघाडीवर आहे. पुढील आठवड्यात संपर्कप्रमुख संजय सावंत याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.

गाळेधारकांचा संप सुरूच

जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी महिनाभरापासून पुकारलेला संप अजूनही कायम आहे. हा संप मागे घेण्याबाबत मनपा प्रशासन किंवा मनपा सत्ताधाऱ्यांकडून देखील कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून गाळेधारकांनी आपली दुकाने उघडली नसून, जोपर्यंत महापालिका प्रशासन गाळेधारकांना दिलेली अवाजवी बिलांची रक्कम कमी करणार नाही, तोवर हा संप कायम राहणार असल्याचा इशारा गाळेधारक संघटनेकडून देण्यात आला आहे.