शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

जळगाव - जिल्ह्यात यंदा अनियमित पाऊस होत असून, यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामालादेखील मोठा फटका बसत आहे. मात्र, गेल्या दोन ...

जळगाव - जिल्ह्यात यंदा अनियमित पाऊस होत असून, यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामालादेखील मोठा फटका बसत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता ८० ते ९० टक्के असून, ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यातदेखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

‘नीर’तर्फे तुळशी रोपांचे वाटप

जळगाव - नीर फाउंडेशनतर्फे तुळशीची रोपे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या रोपांचे भक्तांना वाटप करण्यात आले. पाणी व पर्यावरण या दोन गोष्टींसाठी नीर फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. याप्रसंगी नीर फाउंडेशनचे संस्थापक सागर महाजन, अध्यक्ष भावेश रोहिमारे, प्रतीक निंबाळकर, नयन पाटील, देव महाजन उपस्थित होते.

वाळू रस्त्यावर उपसली

जळगाव - तालुक्यातील आव्हाणे, खेडी या भागातून अवैधरीत्या वाळूउपसा सुरूच आहे. सोमवारी रात्री अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या एका डंपर चालकाने महसूलच्या कारवाईच्या भीतीने कानळदा रस्त्याचा मधोमध वाळू उपसून पळ काढला. ही वाळू रस्त्यावर पसरल्याने वाहनधारकांसाठी अडथळा ठरत आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.