शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मारली दडी, बळीराजाची विस्कटली घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया ...

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून काहींनी पिकांचा पाटा पाडला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणी पेरणी करून आर्थिक झटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैमध्येही एकदाच असा फक्त साठ-सत्तर मिलीमीटर इतकाच पाऊस झाला. ऑगस्ट महिनापण कोरडा जात आहे. भर पावसाचा ऋतू हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.

पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहिवद, सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमा धारकांना संपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे या दुष्काळी गावातील सरपंच, उपसपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

गेल्या साठ-सत्तर वर्षांत पावसाळ्यात पाऊसच झाला नाही, हा पहिलाच प्रसंग पहावयास मिळतो आहे. कितीतरी भयावह परिस्थिती झाली तरीही चाळीस-पन्नास टक्के हंगाम यायचा. चालूवर्षी पाऊसच झाला नाही. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. तीन महिन्यांचा पावसाळा संपत आला. पावसाळ्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असा बळीराजावरील कटू प्रसंग आमच्या साठ-सत्तर वय झाले तरी पाहिला नाही, अशा निराशाजनक प्रतिक्रिया बहुसंख्य वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कथन केल्या.