शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी रेल्वे बांधणार १८ किमीची संरक्षक भिंत; डीआरएम ईती पांडे

By विलास बारी | Updated: September 18, 2023 20:11 IST

जळगावात रेल्वे स्थानकाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : रेल्वे स्टेशन परिसर तसेच मध्य व वेस्टर्न लाइनवर रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे तसेच धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलाडणाऱ्यांचे प्रमाण जास्त वाढल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाकडून जळगावात पथनाट्याद्वारे सोमवारी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी डीआरएम ईती पांडे यांनी रेल्वे लाइनची पाहणी करून १८ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे जळगाव शहरात सोमवारी सकाळी जिल्हा परिषदसमोरील उड्डाणपुलाखाली तसेच सुरत गेट येथे रेल्वे पोलिस पथनाट्य पथकाद्वारे रेल्वे खाली आत्महत्या व रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांबाबत तसेच स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पांडे, सुमन कुमार, एच. श्रीनिवास, निशिध मल, जयप्रकाश मौर्य, डी. पी. सिंग, डी. एच. पाटील, जळगाव स्टेशन प्रबंधक एस. एम. अग्रवाल उपस्थित होते.

रेल्वे ट्रॅकवर केली पाहणी..तहसील कार्यालयाकडून तसेच शिवाजीनगरच्या नवीन बांधलेल्या पुलाखालून अनेक जण रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे होणाऱ्या अपघात व रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण येथे वाढले आहे. या जागेची पाहणी डीआरएम पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधून हा रस्ता बंद करण्याच्या सूचना दिल्या.

रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी रेल्वे पोलिस व कर्मचारी जनजागृती करीत आहेत. तसेच रेल्वे लाइनलगत १८ किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.- ईती पांडे, डीआरएम रेल्वे विभाग भुसावळ.