भुसावळ : जळगाव रेल्वेस्थानकावरील आरक्षण केंद्राजवळ तिकिटांचा काळाबाजार करणार्यास रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या पथकाने सोमवारी रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने शिताफीने अटक केली़ विलास तुकाराम निकम (२८, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे़ आरोपीच्या ताब्यातून जळगाव-नाशिक प्रवासाचे स्लीपरचे तिकीट तसेच जळगाव-कल्याण स्लीपरचे तिकीट व दोन हजारांची कॅश जप्त करण्यात आली असल्याचे रेल्वे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सिनिअर डीसीएम नरेंद्र बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. एसीएम ए़सी़उपाध्याय, हेड टीटी हेमंत सावकारे व प्रशांत ठाकूर यांनी ही कारवाई केली़
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, एक अटकेत
By admin | Updated: May 21, 2014 01:28 IST