जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांना येणा:या विविध समस्या प्रवासातच सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 182 या रेल्वे सुरक्षा बलाच्या हेल्पलाईन संदर्भात प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांसमोर येणा:या गुन्हेगारी, आरोग्य, डब्यांमधील अडचणी यासह विविध समस्या सोडवून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाने नुकतीच 182 क्रमांकाची आरपीएफ हेल्पलाईन सुरू केली आहे. यावर प्रवाशी समस्यांसाठी फोन करून त्या सोडवून घेऊ शकणार आहे. या हेल्पलाइनचा संपर्क भुसावळ येथे असणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाईन
By admin | Updated: December 22, 2015 01:07 IST