शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ््यात जागेअभावी भाजीपाला विक्रेत्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 21:03 IST

आंग्रे तलाव किंवा भुईकोट किल्ल्याचा पर्याय, कायमस्वरूपी हक्काची जागा देण्याची मागणी, मुख्याधिका-यांनी घेतली अ‍ॅक्शन

पारोळा : अनेक वर्षांपासून पिढीजात बाजारपेठत रस्त्याच्या कडेला विक्री करणा-या विक्रेत्यांना हक्काच्या जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. अतिक्रमणामुळे गेल्या तीन दिवसांपासून ठेलागाडीधारकांची विक्री बंद असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने हा प्रश्न लावकरात लवकर सोडवावा, अशी मागणी भाजीपाला विक्रेते करीत आहेत.उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या भाजीपाला विक्रेत्यांना भाडेकरार स्वरूपात जागा उपलब्धा करून द्यायला हव्यात. नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. मात्र, जे विक्रेते नगरपालिकेची परवानगी न घेता भर बाजारपेठेत रस्त्यामध्ये ठेलागाडी लावून भाजीपाला विक्री करतात त्यांच्यावर मात्र अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यामुळे बाजारपेठेत कायमची शिस्त लागेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा पट्टा आखून त्याच्या आत भाजीपाला दुकाने लावावीत. अन्यथा दंडात्मक कारवाईचे नियम करावेत. याबाबत दोन पर्यायांपैकी कोणताही अवलंबल्यास हा तिढा सुटू शकतो. पहिला असा की, आंग्रे तलावात हक्काची जागा दिल्यास त्यांचा जागेचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. या ठिकाणी भाडे करारनामा करून जागा उपलब्ध करून देता येऊ शकेल. तसेच भुईकोट किल्ल्यामध्ये एका बाजूला विक्रीसाठी जागा देऊन दररोज त्या जागेचे भाडेहीे घेता येईल. या उत्पन्नातून किल्ल्याचे जतन आणि संरक्षण करता येईल.नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांचे नागरिकांनी कौतुक केले. बाजारपेठेतील अतिक्रमण ही शहराची गंभीर समस्या आहे. मात्र हा प्रश्न ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकाने व ठेलागाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना जुने भाजीपाला मार्केट किंवा आंग्रे तलावात कायमस्वरूपी जागा देऊ.

-करण पाटील, नगराध्यक्षया प्र्रश्नाबाबत ३५० च्या वर जागा मागणी अर्ज आहेत. छाननी करून निकषात बसतील अशा १०० ते १२५ भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला जागा आखून दिली जाईल. त्यांनी छोटे दुकान लावून त्यांनी व्यवसाय करावा.

-विजयकुमार मुंडे, मुख्याधिकारीभाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वयानुसार डोक्यावर भाजीपाला घेऊन गलोगल्ली फिरणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला जागा विक्रीसाठी जागा द्यावी.

-आशा महाजन, भाजीपाला विक्रेत्या