शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:06 IST

चोरुन चित्रिकरण : राष्ट्रीय सुरक्षा संस्था, पोलीस व विमानतळ प्रशासन यंत्रणा पडली उघडी

ठळक मुद्देपुलवामा घटनेनंतरही गांभीर्य नाही

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या जळगाव विमानतळावरील आगमनप्रसंगी चोरुन काढण्यात आलेल्या व्हीडीओमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्यावेळी सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रिकरण केले. हा व्हीडीओ शनिवारी व्हायरल झाला तशी सुरक्षा यंत्रणेचेही धिंडवडे निघाले आहेत.एकीकडे जळगावच्या विमानतळ परिसरात सर्वत्र पोलिसांचा मोठा ताफा होता. कडक सुरक्षा यंत्रणा होती. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही मीडियाच्या पत्रकारांना देखील दूर ठेवण्यात आले होते. तेथे फक्त तीन शासकीय छायाचित्रकारच दिसून येत होते. पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री हे तीन व्यक्ती तर अतिमहत्वाचे म्हणून ओळखले जातात.पोलीस अधीक्षक, आमदार समोरचविमानाजवळ पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यासह राष्टÑीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी बाहेर थांबलेले दिसून येत आहे. महापौर व आमदार मोदींचे चरणस्पर्श करतात तर पोलीस अधीक्षकांनीही त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.काश्मिमधील पुलवामाच्या घटनेनंतर देशात सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली. मात्र, ज्या ठिकाणी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या आणि अतिउच्च पदावर असलेल्या व्यक्ती आहेत; त्या ठिकाणची सुरक्षा कशी असावी आणि जळगाव येथे मात्र त्याकडे किती गांभीर्याने बघितले जात आहे, हे या व्हिडीओतून अधोरेखित होत आहे. या व्हिडीओमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पाईपाच्या आडून चित्रणमोदींचे विमान व व्हिडीओ चित्रण करणाºयांचे अंतर दोनशे मीटर इतके असतानाही सुरक्षा यंत्रणांना ही व्यक्ती दिसू नये याचे मोठे आश्चर्य आहे. चित्रण करताना ते एकमेकांशी बोलत आहेत. कोणी अडचणीत येवू नये म्हणून खबरदारी घेण्याबाबतही त्यांच्यात चर्चा होत आहे. विमानतळ प्रशासन, राष्टÑीय सुरक्षा यंत्रणा व पोलीस असे तिन्ही विभाग या घटनेतून उघडे पडले आहेत. दुर्देवाने मोठी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार राहिले असते, असा प्रश्न निर्माण होत आहे.