शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात धक्का मारून विवाहितेच्या हातातील मोबाईल लांबविला

By admin | Updated: July 12, 2017 12:15 IST

दुपारी शाळेतून स्कूल बसने घरी येण्याची वेळ झाल्याने सोनाली पाटील या मोहन नगरात रस्त्यावर तिची प्रतीक्षा करीत होत्या.

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - शाळेतून येणाºया मुलीची वाट पाहत असलेल्या सोनाली मनोज पाटील (रा.मोहन नगर, जळगाव) या विवाहितेला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धक्का मारुन त्यांच्या हातातील ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना मंगळवारी भर दुपारी साडे तीन वाजता मोहन नगरात घडली.सोनाली पाटील यांची मुलगी वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी या शाळेत शिक्षण घेत आहे. दुपारी शाळेतून स्कूल बसने घरी येण्याची वेळ झाल्याने सोनाली पाटील या मोहन नगरात रस्त्यावर तिची प्रतीक्षा करीत होत्या. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळून पायी चालत गेला. त्यानंतर थोड्याच वेळाने तो एका दुचाकीवर त्याच्या सहकाºयासह आला व सोनाली पाटील यांना धक्का देत त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन पसार झाला. मोबाईल हिसकावल्यानंतर दुचाकीवरुन जात असताना ‘मोबाईल घेतला...मोबाईल घेतला..’ असे तो ओरडावून सांगत होता. सोनाली पाटील यांनी आरडाओरड केली, मात्र उपयोग झाला नाही. दुपारच्या वेळी या रस्त्यावर फारसी रहदारी राहत नसल्याने त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. दरम्यान, चोरटे शहरातीलच असल्याचा संशय असून परिसरात कुठे सीसीटीव्ही फुटेज आहेत, का याची तपासणी पोलीस करीत आहेत.पोलिसांनाही अपयशमोबाईल पळविल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिल्यानंतर दोन कर्मचाºयांनी चोरटे ज्या मार्गाने गेले त्या मार्गावर त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांच्याही पदरी निराशा पडली. लाल रंगाची व विना क्रमांच्या दुचाकीवरुन दोघं जण आले होते. ते २५ ते ३५ वयोगटातील असावेत असा अंदाज आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.