शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बंदोबस्ताअभावी ‘अतिक्रमण हटाव’ला ‘खो’, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक व 150 कर्मचा-यांचा ताफा चार तास बसून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 12:52 IST

दाणा बाजारात दिवसा ‘नो एन्ट्री’    

ठळक मुद्देपुन्हा बैठकीचे सत्रपोलीस आलेच नाहीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21 - अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी  पोलीस बंदोबस्त मिळू न शकल्याने सुरू होणारी अतिक्रमण निमरूलन मोहीम पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेतील तब्बल 150 कर्मचारी, स्वच्छता मोहीमेवरील एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर व एक ट्रक असा सकाळी 8 ते दुपारी 12.30 असा तब्बल साडेचार तार बसून होता. दरम्यान, ही मोहीम आता  मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील अतिक्रमणांबाबत स्थायी समिती सभेत सदस्यांनी वाढत्या अतिक्रमणांबाबत तक्रार केली असता प्रभारी आयुक्तांनी शहरात धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमणांवर आता जप्तीची कारवाई न करता ते जागीच जेसीबीने नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार गेल्या आठवडय़ात ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र शहरात साथ रोगांची स्थिती लक्षात घेऊन या मोहीमेकडे कर्मचारी वर्ग केल्याने अतिक्रमण मोहीम लांबली. आता सोमवारपासून ही मोहीम राबविण्याचा निर्णय झाला होता. पोलीस आलेच नाहीतकारवाईचे सर्व नियोजन होऊनही सकाळी 9 ते 11 र्पयत शहर व शनिपेठ पोलीस स्टेशनचा ताफा कारवाई मोहीमेत सहभागी झाला नाही. अखेर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशावरून  अपर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान हे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. पुन्हा बैठकदाणा बाजारातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व व्यापा:यांशी दोन  दिवसात बैठक व चर्चा करून मोहीम राबविण्यापूर्वी व्यावसायिकांनी  अतिक्रमणे काढावीत असे ठरले. पुन्हा बैठकीचे सत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या दालनात बैठक झाली. मनपाचे अधिकारी  शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे हेदेखील उपस्थित होते. दुपारी 11 ते 12.30  या वेळात  डीवाय.एस.पी. सांगळे यांच्या दालनात बैठक झाली. मनपाने पोलिसांविना कारवाईचा निर्णय घेतला होता तो सांगळे यांनी मध्यस्थीकरून मागे घेण्याची विनंती केली. सांगळे यांच्या आवाहनानंतर आजची मोहीम रद्द करण्यात येऊन मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून कारवाई सत्र हाती घेण्याचा निर्णय झाला.  कारवाईसाठी अतिरिक्त बंदोबस्त देण्याची तयारीही सांगळे यांनी दर्शविली. दाणा बाजारात दिवसा ‘नो एन्ट्री’    पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे याच्या उपस्थितीत दाणा बाजार असोसिएशनचे पदाधिकारी व मनपा अधिका:यांची बैठक झाली. बैठकीत दाणा बाजारातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या परिसरात सकाळी 7 ते दुपारी 2 व दुपारी 4 ते रात्री 9  या वेळात चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्याचा निर्णय झाला. अन् कर्मचारी परतलेसोमवारी दुपारी 12.30 वाजता आजची मोहीम रद्द झाल्याचा   निरोप महापालिकेत पोहोचल्यावर  मोहीमेसाठी बोलविलेल्या कर्मचा:यांना त्यांच्या विभागात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंगळवारी त्यांना सकाळी 8 वाजता हजर रहाण्याचे आदेशही देण्यात आले. दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, मुकेश लोटवाला, सतीश जगवाणी, लक्ष्मीकांत वाणी, संजय रेदासनी, अशोक धुत, अश्विन सुरवाला आदींनी  या बैठकीत सहभाग घेऊन सहकार्याची तयारी दर्शविली.