जळगाव : जिल्ह्यात सीसीआयने कापसाच्या ७० हजार गाठींची खरेदी केली आहे. तर पणन महासंघाने पाच हजार गाठींची खरेदी केली आहे. सीसीआयची जळगाव जिल्ह्यात ९ केंद्रे आहेत. तर पणन महासंघाची चार ठिकाणी केंद्रे आहेत. त्यात ही खरेदी करण्यात आली आहे.
सीसीआयने पंधरा दिवसात ७० हजार गाठींची खरेदी केली आहे. यंदा १५ लाख गाठींच्या खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. पणन महासंघाची जळगाव विभागातील कापुस खरेदी केंद्रे यंदा २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त पाच हजार गाठींचीच खरेदी झाली आहे.
यंदा जिल्ह्यात ५ लाख ३० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादनात देखईल वाढ होण्याची शक्यता आहे.