शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा बडोदा बँकेच्या व्यवस्थापकसह पंटरला २ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 21:12 IST

लाचप्रकरणी अटकेत

अमळनेर/ पारोळा : पारोळा येथील शेतकऱ्याच्या कर्ज मंजुरीसाठी ७५ हजाराची लाच धनादेशद्वारे स्वीकारणारा बडोदा बँकेचा व्यवस्थापक व त्याच्या पंटरला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईत घरातील १० लाख रुपये आढळल्याने त्याने अनेकांना लुबाडलयाचा संशय बळावल्याने सरकारी वकिलांनी चौकशीसाठी कोठडीची मागणी केली.पारोळा येथील शेतकºयाच्या सात लाख १० हजार रुपये कर्जाच्या मंजुरीपोटी बडोदा बँकेचा व्यवस्थापक किरण ठाकरे याने ८ टक्के प्रमाणे लाच मागितली व बेअरर चेक घेऊन स्वत: ५० हजार व पंटरला २५ हजार दिले. शेतकºयाच्या तक्रारीनुसार पुणे येथील सीबीआयचे अधीक्षक भगेंद्र कढोले, सतीश बोराडे यांनी बडोदा बँकेचा व्यवस्थापक किरण ठाकरे व पंटर नरेंद्र पाटील याना रंगेहात पकडून व्यवस्थापकाच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरात १० लाखाची रोकड सापडली. दोघाना अटक केल्यावर शुक्रवारी त्यांना सीबीआयचे निरीक्षक आनंद रुईकर यांनी अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील अ‍ॅड शशिकांत पाटील यांनी आरोपीकडे १०लाख रुपये सापडले असून त्याने अजून काही ग्राहकांना लुटले किंवा फसवले असण्याची शक्यता असून त्याच्याकडे ज्ञात स्रोतापेक्षा अधिक रक्कम असू शकते म्हणून चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला त्यावर न्या. व्ही. आर. जोशी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.व्यवस्थापक ठाकरे हे दोन वर्षापासून पारोळ्यातअटकेत असलेले आरोपी किरण ठाकरे हे पारोळा शहरातील व्यंकटेश नगर येथे आपल्या परिवारासह राहतात. ते पारोळा शाखेत गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान त्यांच्या गैरहजेरी तशुक्रवारी पारोळा शाखेत व्यवहार पूर्वपदार होते मात्र तूर्त दुसºया शाखा व्यवस्थपकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. या सीबीआयच्या धाडीच्या प्रकाराने शहरात हा विषय दिवसभर चर्चेत राहिला. दरम्यान ज्यांची कर्ज प्रकरणे मंजूर आहेत त्यांना या प्रकारामुळे कर्ज मिळण्यास अडथळे येऊ शकतात अशी शंका व्यक्त होत आहे.