शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकदेवेन शहा हत्या प्रकरण, आरोपी लपला जळगावातील हॉटेलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:06 IST

‘इन्काऊंटर’च्या भीतीने आला जळगावात

ऑनलाईन लोकमत

जळगाव / पुणे, दि. 23-  पुण्यातील बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करणारा रवींद्र सदाशिव चोरगे (वय 41, रा़ निलपद्म सोसायटी, माणिकबाग, पुणे) हा पोलिसाच्या इन्काऊंटरच्या भीतीने जळगाव शहरातील  के. पी. हॉटेलात लपून बसला होता. त्याला रविवारी डेक्कन पोलिसांनी या हॉटेलमधून अटक केली. देवेन शहा यांची रवींद्र चोरगे आणि राहूल शिवतारे यांनी सायली अपार्टमेंटमध्ये  13 जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या केली. शहा यांची हत्या करताना सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोरांचे फुटेज पोलिसांना मिळाले होत़े शिवतारेने पिस्तूलातून झाडलेल्या गोळ्या शहा यांना लागल्या. तर चोरगेने झाडलेल्या गोळ्या तेथे पडलेल्या सापडल्या होत्या. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पुण्यातून बाहेर पडले.नंतर ही दुचाकी कोठे तरी टाकून ते एसटी बस, लक्झरी बसने फिरु लागल़े खोपोलीहून ते अक्कलकोट व तेथून ठाणे, इंदौर, उज्जैनेवरुन                 गेल्या गुरुवारी ब:हाणपूर येथे गेल़े  आपण एकत्र राहिलो तर पकडले जाऊ व पोलीस आपला इन्काऊंटर करतील़ अशी भीती वाटू लागल्याने तेथून ते वेगळे  झाल़े चोरगे हा थेट जळगावात आला होता.रवींद्रचे अंडरवल्र्डशी संबंधपोलिसांनी केलेल्या तपासात रवी चोरगे याचे मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.ब:हाणपूर येथून शहरात पोहचला रवींद्ररवींद्र चोरगे तेथून जळगावला आला व हॉटेल के.पी.मध्ये राहू लागला़ याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, सतीश सोनावणे, पांडुरंग जगताप आणि पोलीस नाईक पांचाळ यांचे पथक तातडीने जळगावला आले. त्यांनी रवींद्रला रविवारी ताब्यात घेऊन पुण्याला नेले. या कारवाईवेळी डेक्कन पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली.  या वृत्तास जळगावातील एका पोलीस अधिका:याने दुजोरा दिला आहे. 

या घटनेतील रवींद्र चोरगे याला जळगाव शहरातील हॉटेल के.पी.मधून अटक करण्यात आली. त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. रवींद्र व राहुल दोघांकडे हत्यारे होती़ त्यांनी ती कोठेतरी टाकून दिली आहेत़ त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे अजून स्पष्ट झालेले नाही़ त्याचा तपास सुरु आहे.                  -डॉ.बसवराज तेली, पोलीस उपायुक्त, पुणे.