शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरु, २५ शेतकऱ्यांना कारवाईचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2023 14:45 IST

हातगाव, म्हसवे, अंजनी क्षेत्रात भरारी पथकांच्या धाडी

कुंदन पाटील, जळगाव : यंदा पावसाअभावी विहिरीतील जलसाठ्याने तळ गाठले आहे. तशातच  ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात पिकांची स्थिती नाजूक होत असताना गिरणासह अन्य जलप्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा सुरु केला आहे. भविष्यात टंचाईचे टचके बसणार असल्याची दाट शक्यता असताना आरक्षित पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ४ ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ शेतकऱ्यांवर कारवाई केली आहे.

चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र विहिरीतील जलसाठा आटल्याने अनेकांनी धरण, तलावकाठी विद्युत मोटारींच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागासह अन्य यंत्रणांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.

१० मोटारी जप्त

हातगाव (चाळीसगाव) व म्हसवे (पारोळा) या दोन्हीठिकाणाहून १० विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर अंजनी (एरंडोल) धरणाच्या बॅकवॉटरमधून पाण्याचा उपसा करणाऱ्या १२ विद्युत मोटारी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना ताकीद देऊन या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. देवळी-भोरस (चाळीसगाव) भागातही शेतकऱ्यांना मोटारी उचलण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.

पथकांकडून तपासणी

गिरणा पाटबंधारे विभागाचे स्थानिक शाखाधिकारी, कॅनाल निरीक्षक, स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, महसुल विभागाचा प्रतिनिधीचा समावेश असलेले पथके प्रकल्पातील जलसाठ्यांवर लक्ष ठेऊन आहेत. विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी वीज कंपनीचे प्रतिनिधी वेळीच दाखल होत नसल्याने कारवाईत अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाने वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.त्यानुसार तांत्रिक कारवाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदा प्रकल्पांमधील जलसाठा पुरेसा नाही. म्हणून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सार्वजनिक हित लक्षात घेत सिंचनासाठी पाण्याची उचल करु नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र