टाकरखेडा रस्त्यावरील ताडेपुरा भागात मारोती मंदिराजवळच पाण्याचे डबके साचले असून, परिसरातील गटारींचे हे सांडपाणी आहे. मंदिराला लागून राज्य मार्ग ६ बेटावद-पाळधी रस्ता असून, कडेला याच विभागामार्फत गटारींचे काम सुरू आहे. मात्र, या गटारी नियोजनशून्य पद्धतीने बांधल्याने परिसरातील सांडपाणी या बांधकामामुळे अडविले जात आहे. त्यामुळे डबके साचून डास, कीटक वाढले आहेत. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले असल्याने या पाण्याचा निचरा करण्यात यावा, तसेच सार्वजनिक शौचालय धुण्यास पाण्याची गाडी पाठविण्यात यावी, बंद पथदिवे सुरू करावेत, रस्ते गटारी सुविधा करण्यात याव्यात, अशा मागण्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
निवेदनावर किरण बहारे, अर्जुन संदानशिव, विद्यानंद बिऱ्हाडे, सुधाकर सरदार, रमेश संदानशिव, किशोर संदानशिव, श्रावण संदानशिव, योगेश संदानशिव, गणेश संदानशिव, योगेश पवार, हिम्मत संदानशिव, कमलबाई शिंपी, मारुती वैदू, अमृत सोळुंखे, मयाराम शिरसाठ, तुळशीराम हातगंडे, देवमन भिल, सुरेश हाताडे, संजय चौधरी, गोविंदा वैदू, आदींच्या सह्या आहेत.
080921\08jal_9_08092021_12.jpg
बांधकाम विभागाच्या गटारींमुळेच पाण्याचे डबके