शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुधा खराटे लिखित ह्यअबोल झाली सतारह्ण कथासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:34 IST

प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावल : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या आई चंद्रभागाबाई सीताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी मारवड, ता. अमळनेर महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय महाजन होते. प्रमुख अतिथी आशा पाटील व मंगला पाटील होत्या.येथील महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. सुधा खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले.डॉ. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, 'अबोल झाली सतार' या संग्रहातील कथांमध्ये मानवी जीवनातील विविध प्रसंग व घटनांचे वास्तववादी दर्शन घडते. भाव-भावनांचे सहज व स्वाभाविक चित्रण या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रा. खराटे यांचे 'नजराणा' व 'अनोखी मैत्री', 'संध्याछाया' आणि 'मनवा' हे तीन ललित गद्यसंग्रहदेखील यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत. 'नजराणा' या कथासंग्रहासाठी तर त्यांना सन २०१६ चा स्व. बाबासाहेब के. नारखेडे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या या नव्या पुस्तकास प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, योगशिक्षिका सुरेखा काटकर, डॉ. सुधीर कापडे, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. मनोज पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :literatureसाहित्यYawalयावल