शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीर पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४, ...

शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४, ५ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यात माधव शिंदे यांच्या पिकाचेही नुकसान झाले. हे प्रकरण गावात मिटण्यासारखे नाही असे दिसताच, माधव शिंदे व इतर शेतकरी तक्रार नोंदविण्यासाठी दैठणा पोलीस स्टेशन, ता. जि. परभणी येथे गेले. सर्व शेतकऱ्यांनी आपआपले तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर झेरॉक्स प्रतीवर पोहोच मागितली. याचा राग येऊन ड्युटीवर असलेला पोलीस बळीराम मुंडे याने माधव शिंदे यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की केली व चेहऱ्यावर दोन जोरदार चापटी मारल्या. अनेक लोकांसमोर हा प्रकार घडला व तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घडलेली घटना चित्रित झाली आहे.

२३ जून रोजी घडलेल्या या प्रकाराची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्याच दिवशी केली. अपराधी पोलिसावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केली होती. आठवडा उलटला तरी दोषी पोलिसावर कारवाई न करता गुन्हेगार पोलिसाला पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी लक्ष घालून, पोलिसावर निलंबनाची कारवाई व केलेल्या अपराधाबद्दल गुन्हे दाखल न केल्यास, ५ जुलै रोजी दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यातील सर्व तालुक्यांतील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत असून, राज्यभरातील शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ. पृथ्वीराज पाटील यांनी तहसीलदार गावंदे व पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिले आहे. निवेदन देताना सचिन भिला पाटील, शेतकरी बाळू नाना पाटील व भीम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे उपस्थित होते.