शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू संपला, मात्र निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:16 IST

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध आता १६ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत कायम ठे‌वण्याचे ...

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध आता १६ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत कायम ठे‌वण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १४ मार्च रोजी दिले आहे. जळ‌गाव महापालिका क्षेत्रातील जनता कर्फ्यू व चाळीसगाव, चोपडा येथील निर्बंध शिथिल करण्यात आले असून नवीन निर्बंधांमध्ये अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबी वगळता इतर दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरू राहणार आहे. या सोबतच शनिवार, रविवार धार्मिक स्थळेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने २२ फेब्रुवारीपासून ते ६ मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर त्यापेक्षाही अधिक झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने निर्बंध मागे न घेता ते १५ मार्चपर्यंत कायम ठे‌वण्यात आले. त्यानंतर आता दररोज रुग्णसंख्या ९००च्या पुढे येत असल्याने हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

जिल्ह्यातील आठवडे बाजारही बंद राहणार असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच सिनेमागृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगिचे बंद ठेवण्याचेही आदेश दिले आहे. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने आणले असून मर्यादित उपस्थितीत केवळ निवेदन देता येणार आहे.

जनता कर्फ्यू शिथिल

कोरोना नियंत्रणासाठी जळ‌गाव महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू व चाळीसगाव, चोपडा येथे निर्बंध घालण्यात आले होते. ते आता शिथिल करण्यात आले आहे. मात्र आता पूर्वीचे निर्बंध बेमुदत राहणार असल्याने शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार कधी सुरू होणार हे अनिश्चित झाले आहे.