शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत सत्ताधाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

राष्ट्रवादीचे आगळे-वेगळे आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता बिकट झाला असून, बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ...

राष्ट्रवादीचे आगळे-वेगळे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता बिकट झाला असून, बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भंगार बाजार परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची वाट लावली असून, मनपा निवडणुकीच्या वेळेस केवळ घोषणांचा बाजार सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. त्यामुळे ख‌ड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून मनपातील सत्ताधाऱ्यांचा निषेध या आंदोलनातून करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वक्ता प्रशिक्षणचे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल, अशोक लाडवंजारी, ममता तडवी ,पंकज नाले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या वेळेस शहराचा कायापालट करू, असे आश्वासन दिले होते; मात्र सत्ताधारी भाजपला या आश्वासनाचा विसर पडलाय की काय ? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला. जळगावकरांना दररोज खड्ड्यांच्या समस्यांमुळे अपघाताना सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने खड्ड्यांमध्ये केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. मनपा प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची केलेली दुर्दशा लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.