शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या वस्तीत छापा, 20 ग्राहकांना अटक

By admin | Updated: April 25, 2017 00:04 IST

दीनदयाल नगरात कारवाई : 31 महिलांची सुटका, मालकिणींसह दलालांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील कुंटण खाण्यावर (वेश्या वस्ती) पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात  31 महिलांसह 20 ग्राहकांना अटक करण्यात आली़ या प्रकरणी रात्री उशिरार्पयत तीन मालकिण व चार दलाल व 20 ग्राहक अशा 28 आरोपींविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़दरम्यान, वेश्या वस्तीत अल्पवयीन मुलींचा वापर होत असल्याची माहिती पुण्याच्या फ्रीडम फर्मला मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली़ ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये पाच अल्पवयीन मुलींचा समावेश आह़े सर्व महिलांची रात्री उशिरा महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली़अतिशय गुप्त पद्धत्तीने कारवाईअपर पोलीस अधीक्षक मोक्षदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कशा पद्धत्तीने करावी या संदर्भात नियोजन करण्यात आल़े शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांना पोलीस उपअधीक्षक कार्यालयात बैठक असल्याचे सांगून बोलावल्यानंतर सर्वाना वाहनात बसवल्यानंतर स्वत: नीलोत्पल यांनी त्यांना जामनेर रोडवरील वेश्या वस्तीत अत्यंत गुप्त पद्धत्तीने व कुणीही गुन्हेगार पळून जाणार नाही या पद्धत्तीने काळजी घेत कारवाईच्या सूचना केल्या़ प्रथमच अशा पद्धत्तीने धाडसी कारवाई झाल्याने सुज्ञ जनतेतून स्वागत होत आह़े दरम्यान, महिलांची रात्री उशिरा महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली तर पकडलेल्या 20 ग्राहकांना मंगळवारी न्यायालयार हजर केले जाईल़बनावट ग्राहक पाठवून केली कारवाईदीनदयाल नगरात पोलिसांतर्फे बनावट ग्राहक पाठवून आधी व्यवसाय सुरू असल्याची निश्चिती करण्यात आली तसेच सोबत तीन शासकीय पंचदेखील पाठवण्यात आल़े बनावट ग्राहकांसोबत पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या त्यामुळे न्यायालयात खटला उभा झाल्यानंतर दोषींना शिक्षा होण्यास मदत होणार असल्याचे नीलोत्पल म्हणाल़े  पुण्याच्या फ्रीडम फर्मचे सत्यजीत देसाई, आश्विन राठोड, नम्रता सावळे, सैरिना डिसुजा आदींनी तब्बल तीन आठवडाभर वेश्या वस्तीत चालणा:या व्यवसायावर नजर ठेवली़ अधिकृत खातरजमा झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली़ धडक कारवाईत यांचा सहभागही कारवाई नीलोत्पल यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, उपनिरीक्षक नरेंद्र साबळे, आनंदसिंग पाटील, प्रदीप पाटील, बंटी सैंदाणे, दीपक जाधव, विकास सातदीवे, सुधीर विसपुते यांच्यासह आरसीपी प्लाटून तसेच 26 महिला पोलीस कर्मचा:यांनी केली़ शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचा:यांची कारवाई करण्यासाठी मदत घेण्यात आली़ पोलिसांना अखेरच्या क्षणात कारवाई कुठे कारवाई होणार याबाबत कळाल़े