अमळनेर, जि.जळगाव : शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती स्थानिक शाखाध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली१९५२ ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला भरले होते. त्यानंतर संत सखाराम महाराज, सानेगुरुजी, श्रीमंत प्रताप शेठ व अझीम प्रेमजी यासारख्या अमळनेरात कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या महान व्यक्तींना अभिवादन करण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.गेल्या चार वर्षांपासून अमळनेरला साहित्य संमेलन व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र साहित्य संमेलन झाले आहे. फक्त उत्तर महाराष्ट्र बाकी असल्याने यंदा संधी मिळेल, अशी आशा आहे. १० जणांची समिती प्रत्यक्ष पाहणी करेल. मग निर्णय घेतला जाईल. मात्र संमेलनाच्या पूर्वतयारीची पाहणी केली असून, मराठी वाङ्मय मंडळ संमेलन घेण्यास सक्षम आहे, असेही डॉ.जोशी म्हणाले.यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर तालुक्याचे शरद धनगर, कुणाल पवार, रमेश पवार आदींना प्रत्यक्ष कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण आले होते.
अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:44 IST
शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे,
अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचा प्रस्ताव
ठळक मुद्देअमळनेरातील साहित्य प्रेमींची सुरू आहे धडपडमराठी साहित्य संघाध्यक्षांना दिले पत्र