धुळे : जिल्ह्याचा विस्तार वाढत आह़े त्यामुळे तालुका निर्मितीची गरज असल्याने धुळे ग्रामीण व पिंपळनेर ही दोन तालुके निर्मितीचे फेर प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़ धुळे ग्रामीण, साक्री तालुक्यातून पिंपळनेर व शिंदखेडा तालुक्यातून दोंडाईचा तालुक्याची निर्मिती करावी़ अशी मागणी गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली होती़ पालक सचिव यांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या़ हे काम सुरू आह़े यापूर्वीही पाठविला होता प्रस्ताव धुळे ग्रामीण व पिंपळनेर तालुका निर्मितीचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षापूर्वीच तत्कालीन जिल्हाधिका:यांनी शासनाकडे पाठविला होता़ आता फेर प्रस्ताव पाठविण्यात येणार आह़े
दोन तालुका निर्मितीचे प्रस्ताव!
By admin | Updated: October 10, 2015 00:53 IST