शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निषेधाचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:40 IST

घोषणा देत युवक उतरले रस्त्यावर

ठळक मुद्देव्यापाऱ्यांसह हमाल, कामगारांचाही सहभाग ; २०० कोटींची उलाढाल ठप्प

जळगाव-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ शनिवारी शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होती. तसेच शहरात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेधार्थ पाकीस्तानचे झेंडे जाळण्यात आले, तसेच अनेक युवकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यांवर येवून ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देताना दिसून आले.सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हाच संताप शनिवारी जळगावच्या तरुणांमध्ये दिसून आला. कोठल्याही पुर्वघोषणेशिवाय, कोणाच्याही दबावात किंवा कोणाच्याही सूचनेशिवाय केवळ स्वयंस्फुर्तीने जळगावकरांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ कडकडीत बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेतला. व्यापारी, हमाल, कामगारांसह सर्वच स्तरावरील व्यावसायीकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.दाणाबाजारात कडकडीत बंददाणा बाजार असोसिएशनकडून देखील शनिवारी बंद पुकारण्यात आला. सकाळी १० वाजता दाणाबाजारातील सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येवून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये व्यवहार थांबवण्यात आले आहेत. नागरिकांसह व्यापाºयांनी स्वेच्छेने हा बंद पाळून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला. शनिवार हा बाजाराचा दिवस असतानाही दाणा बाजार बंद ठेवण्यात आल्यामुळे तब्बल १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण पगारीया यांनी दिली.‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी दणाणले गोलाणी मार्केटगोलाणी मार्केटमध्येही सर्व व्यापारी व व्यावसायीकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास सर्व व्यावसायीक मार्केटमध्ये एकत्र येवून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘वंदे मातरम, भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी गोलाणी मार्केट दणाणून निघाले होते. सर्व व्यापारी बांधवांकडून यावेळी आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील बंद मध्ये सहभागी असलेल्या युवकांनी घेतली.