शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वच्छतेच्या क्रमवारीत जळगाव शहराची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:00 IST

राज्यात २१ वा क्रमांक

ठळक मुद्दे ८४ वरून ७६ वे स्थान मिळविले; वर्षभरातच मारली मुसंडी

जळगाव : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत जळगाव शहराने स्वच्छतेच्या बाबतीत देशभरात ७६ वा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराचा ८४ क्रमांक होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत शहराच्या स्वच्छतेच्या दर्ज्यात वाढ झाली आहे.केंद्र शासनाकडून ४ ते ३१ जानेवारीदरम्यान ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ही स्पर्धा संपुर्ण देशभरात राबविण्यात आली. ही स्पर्धा एकुण ५ हजार गुणांसाठी घेण्यात आली. यामध्ये १२५० गुण शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा अहवाल, १२५० गुण शहरातील हगाणदरीची स्थिती, १२५० गुण नागरिकांकडून आलेला अहवाल तर १२५० गुण हे प्रत्यक्ष पाहणीसाठी ठेवण्यात आले होते. जळगाव शहराला ५ हजार गुणांपैकी ३ हजार ३१ गुण प्राप्त झाले.या वर्षी देशभरातून पाच हजार शहरांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तर गेल्या वर्षी साडे चार हजार शहरे सहभागी झाले होते. त्यात जळगाव शहराचा ८४ वा क्रमांक होता. यंदा मात्र यात प्रगती झाली आहे. त्यात ७६ वा क्रमांक मिळविला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही हे यश मिळाले.कचरा प्रक्रिया नसल्याने ५०० गुणांचा फटकाशहराने यंदा स्वच्छतेच्या दर्जा वाढवला असून, यासाठी आयुक्त चंद्रकांत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील व स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक महेंद्र पवार यांनी उल्लेखनीय काम केले. विशेष करून या अभियानादरम्यान शहरातील भिंतीवर पेंटींग्सव्दारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे शहराच्या गुणांमध्ये चांगलीच वाढ झालेली असल्याचेच लक्षात येत आहे.मात्र, जळगाव मनपाचा घनकचरा प्रकल्प बंद असल्याने शहरातील कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे शहराचे ५०० गुणांचे नुकसान झाले आहे. तसेच शहराचे ओडीएफ प्लसचे सर्वेक्षण झाले नसल्याचाही फटका या रॅकींगमध्ये बसला आहे.कचरा प्रक्रिया सुरु राहिली असती तर शहराचे रॅकींग ५० च्या आत राहिले असते.प्रत्यक्ष पाहणीत शहराला मिळाले सर्वाधिक गुणशहराचे मुल्यांकन हे दैनंदिन स्वच्छतेचा अहवाल, हगणदारीची स्थिती, नागरिकांकडून आलेला अहवाल व प्रत्यक्ष पाहणी या चार निकषांवर हे सर्वेक्षण पार पडले. यामध्ये जळगाव शहराला ५ हजार पैकी ३०३१ गुण मिळाले असून, सर्वाधिक गुण हे प्रत्यक्ष पाहणीत मिळाले आहेत.