शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांच्या भेटीने भारावले जळगावच्या कारागृहातील कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:00 IST

दीर्घ प्रतीक्षा करुनही कैद्यांशी भेट न होणे अथवा झालीच तर अवघ्या दोन मिनिटात भेट आटोपणे यामुळे कैदी व नातेवाईक यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी शनिवारी रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कैद्यांची मनमोकळीपणे भेट घेण्याची संधी कारागृह प्रशासनाने उपलब्ध करुन दिली होती.  मनमोकळी भेट झाल्याने कैदी भारावून गेले होते. या भेटीतून कैदी व नातेवाईकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

ठळक मुद्देकारागृहात गळाभेट कार्यक्रम कैद्यांच्या मुलांना वह्या, पुस्तकांसह कपडे वाटपआठवणींनी दिले हुंदके

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,११: दीर्घ प्रतीक्षा करुनही कैद्यांशी भेट न होणे अथवा झालीच तर अवघ्या दोन मिनिटात भेट आटोपणे यामुळे कैदी व नातेवाईक यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी शनिवारी रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कैद्यांची मनमोकळीपणे भेट घेण्याची संधी कारागृह प्रशासनाने उपलब्ध करुन दिली होती.  मनमोकळी भेट झाल्याने कैदी भारावून गेले होते. या भेटीतून कैदी व नातेवाईकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

कैद्यांच्या मनातील नैराश्य दूर व्हावे यासाठी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी शनिवारी कारागृहातील सर्व कैद्यांना त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना मुक्तपणे भेटण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यानुसार प्रभारी कारागृह अधीक्षक सुनील कुंवर यांनी सकाळी ९ ते दुपारी दीड या वेळेत सर्व कैदी व त्यांच्या नातेवाईकांना मुक्तपणे भेटण्यासाठी कारागृह खुले केले होते.

आठवणींनी दिले हुंदकेकारागृहात आलेले कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आहेत. जन्मत: कोणी गुन्हेगार नसतो. अनेक वेळा कळत न कळत माणसाच्या हातून चुका होतात. गुन्हा घडल्यानंतर पश्चाताप होतो, त्यामुळे अशा घटनांमधूनही बोध घेता येतो व त्यातून मार्गही निघतो अशा शब्दात अनेक नातेवाईकांनी कैद्यांना धीर दिला. यावेळी कैदी व नातेवईकांना हुंदके आवरणे कठीण झाले होते. या भेटीत महिलांची संख्या लक्षणिय होती. महिलांसोबत आलेल्या त्यांच्या मुलांना कैद्यांनी अलिंगन देत चुंबन घेतले. अनेक नातेवाईकांच्या खूप दिवसानंतर भेटी झाल्या. जिल्ह्यातील कानाकोपºयातून नातेवाईक आले होते.