शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्यांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:21 IST

महा अवयवदान अभियान : कैद्याने दिले संमतीपत्र भरून

ठळक मुद्देमृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहाउपस्थित कैद्यांनी केली अवयवदानाची प्रतिज्ञा बहुतांश कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  

राज्यात महा अवयवदान महोत्सव सुरू असून या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील कैदी सचिन गुमानसिंग जाधव याने मृत्यूपश्चात अवयवनदान करण्याचे संमती पत्र जिल्हा कारागृह अधीक्षक सुनील कुवर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे भरुन दिले.  या कैद्याच्या निर्णयाचे उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात कौतूक केले. या वेळी 436 कैदी उपस्थित होते. बहुतांश कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला असून ते संमतीपत्र नंतर भरुन देणार आहे. महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, व जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमानिमित्त  जिल्हा कारागृहात अवयवदानाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. एन. एस. चव्हाण, सुनील कुवर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जी. एम फाउंडेशनचे अरविंद देशमुख, आरोग्य दीप किडनी फाउंडेशनचे डॉ. शशिकांत गाजरे, अयाज मोहसीन, सागर महाजन आदी उपस्थित होते.

मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहा मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  चव्हाण म्हणाले की, शरीर हे नष्ट होणारे आहे. मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत रहायचे असेल तर अवयवदान केले पाहिजे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना आपण शरीराचे कोणते अवयव कधी दान करू शकतो हेच माहिती नसते. यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे. या अभियानाची जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जनजागृती होत असल्याचे सांगून अवयवदानाबाबत सविस्तर माहिती दिली. कैद्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण वेगळा आहे. असे सांगून  सुनील कुवर म्हणाले की, कैदीहा कधीही वाईट नसतो तर त्याला परिस्थिती वाईट बनविते. कैद्यांनी कोणताही न्यूनगंड न ठेवता आपणही समाजाचेच घटक आहोत असे समजून वागावे. कारागृहात आल्यानंतर त्यांच्यात निश्चित बदल होत असतो. याचे उदाहरण म्हणजे कैद्यांनी आज केलेला अवयवदान संकल्प होय. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा संकल्प करून समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचेही  कुवर यांनी सांगितले.  उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.  अवयवदान जनजागृती कार्यक्रमानंतर अनेक कैद्यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला. प्रातिनिधीक स्वरुपात बंदी सचिन  जाधव याने अवयवनदान संमती पत्र भरून दिले. उपस्थित कैद्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली. प्रति™ोचे वाचन विलास बोडके यांनी केले. ज्ञानेश्वर पांढरे, आनंदा पाटील यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व कैदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  सागर महाजन यांनी आभार  मानले.