शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

चोपडा : पंतप्रधान आवास योजनेबाबत लाभार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या महाजन यांनी केली आहे. याबाबत ३० ...

चोपडा : पंतप्रधान आवास योजनेबाबत लाभार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका संध्या महाजन यांनी केली आहे. याबाबत ३० जुलै रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत संध्या महाजन यांनी निवेदन सादर केले.

विभागीय आयुक्तांच्या पत्रांनुसार कामे सुरू न झालेल्या लाभार्थ्यांना १५ दिवसांची नोटीस देऊन इच्छुक नसलेल्या लाभार्थ्यांची नावे ३० जुलैपर्यंत वगळण्याची कार्यवाही करण्याबाबत नगरपालिकांना आदेश आहेत. चोपडा नगर परिषदेतर्फे पंतप्रधान आवास योजना घटक क्रमांक ४ वैयक्तिक घरकुलास अनुदान अंतर्गत २०० व १३५ लाभार्थी असे २ डीपीआर मंजूर आहेत. सदर घटकांतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्याकामी कागदपत्रांची पूर्तता, पतव्यवस्था अशा काही बाबींची तजवीज करावी लागते. परंतु मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने वैयक्तिक घरकुलांचे बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. अशा काही अडचणी असलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुले बांधकामास सुरुवात झालेली नाही.

परंतु वरील अडचणींमुळे नागरिक इच्छुक असूनही त्यांची नावे वगळण्याची वेळ आलेली आहे. यादीत समाविष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा. त्यामुळे कागदपत्रांची वा इतर अडचण असलेल्या, परंतु बांधकामास इच्छुक लाभार्थ्यांना अधिक वेळ मिळावा, त्यांची नावे वगळण्याची मुदत ३० जुलैवरून वाढविण्यात यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांची कामे सुरू आहेत, परंतु अनुदानाचे हप्ते पूर्ण मिळाले नाहीत, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते वितरित करण्यासाठी नगर परिषदेस राज्य तसेच केंद्र शासनाचा उर्वरित निधी मिळावा. शहरातील मंजूर लाभार्थ्यांनाही वाळू उत्खननाबाबत सवलत मिळावी. अतिक्रमित जागांवर राहणारे लाभार्थी व भाडेकरू म्हणून राहणारे / बेघर नागरिक यांनीदेखील नगर परिषदेस सन २०१७ पासून अर्ज केलेले आहेत. त्या कामी नगर परिषदांकडून माहिती मागविणे व डीपीआर सादर करण्याकामी उचित त्या कार्यवाहीबाबत निवेदन लाभार्थ्यांना देण्यात आले.

या निवेदनास शिवसेना गटनेता महेंद्र धनगर, नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, लताबाई पाटील, मीनाबाई शिरसाठ यांनी अनुमोदन दिले आहे.