शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पगुच्छा ऐवजी बहिणाबाईच्या कवितांचे पुस्तके देऊन पंतप्रधानांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:49 IST

जळगाव विमानतळावर महापौर, जि.प.अध्यक्षा, आमदारांची उपस्थिती

जळगाव : धुळे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाण्याकरिता नागपूर येथुन विमानानाने जळगाव विमानतळावर आल्यावर महापौर सीमा भोेळे यांनी पंतप्राधान नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ न देता, खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी तब्बल २२ मिनिटे थांबुन, पंतप्रधान मोदी हे विशेष हेलीकॉप्टरने धुळ्याकडे सभेसाठी रवाना झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर येथील कार्यक्रम आटोपून एअरफोर्सच्या बीबीजे या विशेष विमानानाने जळगाव विमानतळावर शनिवारी दुपारी २ वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळ येथुनच राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते.बहिणाबाईचे पुस्तक देऊन मोदींचे स्वागतजळगाव विमातळावर मोदींचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जि.प. अध्यक्षा उज्जवला पाटील, जिल्हाधिकारी डॉ. उदय ढाकणे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. विमानातून उतरताच, स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना मोदी यांनी हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांचे लेखीका प्रमिला भिरुड यांनी अनुवाद केलेले पुस्तक भेट देऊन, अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यानंतर ही मंडळी धुळ्याकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले.पोलिसांचा कडक बंदोबस्तपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर व विमानतळ परिसराच्या बाहेरील सर्व रस्त्यावर सकाळपासून शस्त्रधारी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विमानतळावर तपसाणीनंतरच प्रत्येकाला प्रवेश दिला जात होता. अजिंठा चौकापासून ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. धुळ्याची सभा आटोपून मोदी हे सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जळगाव विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधानांनी दिली खान्देशलाधुळे जिल्ह्यातील कार्यक्रमांसाठी जळगाव विमानतळ व धुळ्याहून दिल्लीकडे प्रयाण करण्याच्या काळात तब्बल तीन तास ३५ मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खान्देशसाठी देऊन विविध विकास कामांचा शुभारंभ धुळे येथून केला. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी मोदी यांचे जळगाव विमानतळावर खास विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने धुळ्याकडे रवाना झाले. धुळे येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्यांचे पुन्हा जळगाव विमानतळावर आगमन झाले व त्यानंतर ५.३० वाजता विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.

टॅग्स :Politicsराजकारण