शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात जाण्यापूर्वीच पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. ...

जळगाव : साई गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेर बोअरवेल सुरू करताना विजेचा धक्का लागून अनुपम मोहन प्रसाद (२५, रा. योगेश्वर नगर, मूळ रा. सटना, मध्य प्रदेश) या तरुण पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता जुने जळगाव रोड परिसरातील तुळजाई नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनुपम प्रसाद हे तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात पुजारी असून शेजारच्याच योगेश्वर नगरात ते वास्तव्याला होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पावणे सात वाजता पूजा व आरती करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. या ठिकाणी त्यांनी बाहेरील स्वच्छता केली. नंतर मंदिराच्या आवारात झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटण दाबण्यासाठी गेले असता त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होत असल्याने मंदिराच्या शेजारी रहात असलेल्या विमल कुदळ या मंदिरात आल्या असता त्यांना पुजारी प्रसाद पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळी तसेच झाडूच्या साहाय्याने वीजप्रवाह खंडित करून प्रसाद यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून माहिती घेतली तसेच पंचनामा केला. पुजारी प्रसाद हे मूळ मध्य प्रदेशातील सटना येथील रहिवासी आहे. सात वर्षांपासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आई-वडील गावाकडे असल्याने एकटेच राहत होते.

पावसामुळे उतरला वीजप्रवाह; शनिवारी झाला वर्धापन दिन

शनिवारी रात्री पाऊस झाल्याने त्यात काहीतरी बिघाड होऊन डीपीत वीजप्रवाह उतरला होता. सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी आपल्या कामाला लागले आणि त्यात ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ मध्ये साईगणेश मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून अनुपम प्रसाद हेच पुजारी म्हणून काम पाहत होते. शनिवारी १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पुजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होऊन प्रसादाचे वाटप झाले होते. रविवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येऊन डीपीवरील पुरवठा खंडित करण्याबाबत सांगण्यात आले; मात्र ७ तास उलटूनही वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.